ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

कुंभेजा येथील शेत वस्तीवर सशस्त्र दोरोडा. Armed Robbery at a Farm Settlement in Kumbheja. माजी सैनिक विश्वनाथ जगताप गंभिर जखमी. रात्रीचा खंडीत विजपुरवठ्यामुळे ग्रामस्थांची नाराजी.

कुंभेजा येथील शेत वस्तीवर सशस्त्र दोरोडा.

माजी सैनिक विश्वनाथ जगताप गंभिर जखमी.

रात्रीचा खंडीत विजपुरवठ्यामुळे ग्रामस्थांची नाराजी.

Armed Robbery at a Farm Settlement in Kumbheja.
(AI Image)  Armed Robbery at a Farm Settlement in Kumbheja.

रंगोली न्युज - परंडा दि. २५) 

Armed Robbery at a Farm Settlement in Kumbheja. धाराशिव जिल्हा परंडा तालुक्यातील कुंभेजा येथील कॅनॉल शेजारी असलेल्या विश्वनाथ जगताप यांच्या वस्तीवर दि. २५ फेब्रुवारी रोजी ५ जणांनी दरोडा टाकून माजी सैनिक विश्वनाथ जगताप वय ७० वर्ष, यांच्या शरिरावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले व सोने व रोख रकमेचा मुद्देमाल घेऊन पसार झाले.

Armed Robbery at a Farm Settlement in Kumbheja.
Armed Robbery at a Farm Settlement in Kumbheja.

       मिळालेली माहीती अशी की, विश्वनाथ जगतात व त्यांच्या पत्नी सौ. लता जगताप या कुंभेजा येथील कॅनॉल शेजारील शेतातील वस्तीवरील घरासमोर झोपले असताना रात्री १२:३० वाजनेचे दाम्यान ५ दरोडेखोर आले. माजी सैनिक विश्वनाथ जगताप यांना झोपलेल्या जागेवर सोन व पैसे कुठे ठेवले आहेत म्हणत धारदार शस्त्राने जोराचे सपासप वार केल्याने विश्वनाथ जगताप हे गंभीर जखमी झाले. या दरम्यान लता जगताप यांच्या गळ्यातील दोन तोळे सोन्याचे गंठन व इतर व रोख ६० हजार रूपयेचा मुद्देमाल दरोडेखोरांनी ताब्यात घेतला. यामध्ये सौ. लता जगताप यांनी तात्काळ बाहेर जाऊन आरडा ओरडा केला. त्यानंतर आसपासच्या वस्तीवरील शेतकरी जमा होऊ लागल्याच दरोडेखोरांच्या लक्षात येताच त्यानी पळ काढला व दरोडेखोर पसार झाले.

 

Armed Robbery at a Farm Settlement in Kumbheja.
Armed Robbery at a Farm Settlement in Kumbheja.

   माजी सैनिक विश्वनाथ जगताप यांच्यावर दरोडेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला केल्याने या हल्ल्यात विश्वनाथ जगताप हे गंभिर जखमी झाले आसून त्यांच्यावर प्राथमिक उपचार परंडा, बार्शी येथील रुग्णालयात करून पुढील उपचारा साठी त्यांना तात्काळ पुणे येथील रुगणालयात दाखल करण्यात आले.

       या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले, परंडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले, परंडा पो.ठा. येथील सहाय्यक पो.नि. सिरसट, सहाय्यक पो.नि. शंकर सुर्वे, पो.उ.नि. खरात, पोलीस अधीकारी गजानन मुळे, पवार, पो.ह. शिंदे, शेख, शेवाळे, सरगर व तसेच स्थानिक गुन्हे शाखाधिकारी विनोद इज्जापवार व त्यांचे समवेत अधीकारी व श्वानपथक, फिंगरप्रिंट तज्ञ, फॉरन्सीक व्हाॅन असे तात्काळ घटनास्थळी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची व परिसराची सखोल पाहणी केली. या प्रकरणी सौ. लता जगताप यांनी परंडा पोलीस ठाणे येथे  वरील पाच आरोपी विरूध्द दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस अधिक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मर्गदर्शनाखाली  पुढील तपास सहाय्यक पो.नि. सुर्वे हे करत आहेत. 

[ ] रात्रीचा खंडीत विजपुरवठ्यामुळे ग्रामस्थ चिडले.

       या घटनेमुळे कुंभेजा व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदरची घटना ही महावितरण चा विद्युत पुरवठा बंद असल्यामुळेच चोरट्यांनी डाव साधला, त्यामुळे महिवितरण कंपनी बद्दल त्या परिसरातील नागरीकांमध्ये म.वि.वी. कं. वर तिव्र नाराजी असल्याची चर्चा कुंभेजा येथील ग्रामस्थांकडून होत आहे.




आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी 

👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

Post a Comment

0 Comments