ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

परंडा येथे अवतरली शिंदेशाही! डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भाजपा च्या वतीने अनोखी मानवंदना! The Shinde Dynasty Descends upon Paranda!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भाजपा च्या वतीने अनोखी मानवंदना! 

परंडा येथे अवतरली शिंदेशाही! 

The Shinde Dynasty Descends upon Paranda!
The Shinde Dynasty Descends upon Paranda!

रंगोली न्युज - परंडा दि. २४) 

The Shinde Dynasty Descends upon Paranda! भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने परंडा येथील जिल्हा परिषद शाळा येथे प्रख्यात कवी गायक आनंद शिंदे यांचा शिंदेशाही गाण्याचा कार्यक्रम भाजपा युवा नेते मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून व भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न. 

The Shinde Dynasty Descends upon Paranda!
The Shinde Dynasty Descends upon Paranda!

    या भीम गीतांचा भव्य महासंगीत सोहळ्यामध्ये वातावरण भारावून गेले. कार्यक्रमाचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन मा.आ. सुजितसिंह ठाकूर व युवा नेते मल्हारदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. 

       गायक आनंद शिंदे यांच्या सुरेल गायनाने भीमगीतांचा जल्लोष शिगेला पोहोचला. जोश, उत्साह आणि अभिमानाने भरलेला हा ऐतिहासिक सोहळा अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. संपूर्ण परिसर जयभीमच्या घोषणांनी दुमदुमला. 

The Shinde Dynasty Descends upon Paranda!
The Shinde Dynasty Descends upon Paranda!

    याप्रसंगी भाजपा नेते सुजितसिंहजी ठाकूर, युवा नेते मल्हारदादा पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान सदस्य धनंजय सावंत, कृषी व पशुसंवर्धन सभापती भाऊसाहेब खरसडे, समाज कल्याण सभापती विश्वास कोकणे, उपनगराध्यक्ष समरजीतसिंह ठाकूर, भाजपा तालुकाध्यक्ष अरविंदबप्पा रगडे, भाजपा नेते गौतम लटके, जयदेव गोफणे, शहराध्यक्ष उमाकांत गोरे, जिल्हा परिषद सदस्य रेवन ढोरे, नगरसेवक तथा युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश विधाते, नगरसेवक राहुल बनसोडे, ॲड. जहीर चौधरी, तानाजी पाटील, धनाजी गायकवाड महिला मोर्चा तालुकाध्यक्ष प्रियंकाताई क्षीरसागर, शहराध्यक्ष ज्योतीताई भातलवंडे, शुभदाताई शेलार उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिपक गायकवाड, निशिकांत क्षिरसागर, धनंजय काळे, अजिम हन्नुरे, गौरव पाटील, मनोहर पवार, अमर ठाकूर, रामदास गुडे, रामकृष्ण घोडके, सिध्दीक हन्नुरे, सुरज काळे यांनी परिश्रम घेतले. यावेळी महायुतीचे जि.प., पं.स. सदस्य, नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी 

👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

Post a Comment

0 Comments