प्रेरणा हायस्कूलच्या २००८ बॅचचा स्नेहमेळावा; १८ वर्षांनंतर मित्र पुन्हा एकत्र.
१८ वर्षांनंतर पुन्हा भरला वर्ग; प्रेरणा हायस्कूलच्या २००८ बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात.
![]() |
| Prerana High School's Class of 2008 Reunion; Friends Reunited After 18 Years. |
रंगोली न्युज - परंडा | दि. ११
Prerana High School's Class of 2008 Reunion; Friends Reunited After 18 Years. शालेय जीवनातील निखळ मैत्री, गुरुजनांप्रती असलेला आदर आणि तब्बल १८ वर्षांनंतर पुन्हा वर्गातील बाकावर बसण्याचा आनंद… अशा भावूक आणि उत्साही वातावरणात परंडा येथील प्रेरणा हायस्कूलच्या ‘स्नेहबंध २००८ बॅच’चा गुरुवंदना व स्नेहमेळावा रविवारी (दि. १० मे) उत्साहात संपन्न झाला. जुन्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान केला.
आध्यात्मिक व शैक्षणिक विचारांची मेजवानी
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक हनुमंत यादव होते. प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध किर्तनकार व शिवव्याख्याते ह.भ.प. बालाजी महाराज बोराडे, शिराळा रामेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश गुंजाळ, प्रा. शरद झोंबाडे व शफीक पटेल उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना ह.भ.प. बालाजी महाराज बोराडे यांनी “मैत्री आणि अध्यात्म यांचा संगम जीवनाला योग्य दिशा देतो,” "The confluence of friendship and spirituality gives life the right direction." असे सांगत गुरु-शिष्य नात्याचे महत्त्व अधोरेखित केले. प्रा. शरद झोंबाडे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे कौतुक केले, तर शफीक पटेल यांनी “विद्यार्थी बदलले तरी शिक्षकांमधील वात्सल्य कधीच बदलत नाही,” असे भावनिक उद्गार काढले.
२१ गुरुजनांचा गौरव
या बॅचला घडविणाऱ्या २१ गुरुजनांचा श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. सन्मानित गुरुजनांमध्ये गोविंद जाधव, हनुमंत यादव, शफीक पटेल, शरद झोंबाडे, तुकाराम देशमाने, महादेव मारकड, जीवन सुरवसे, सुधीर यादव, दादासाहेब जगताप, सुरेश गुंजाळ, जालिंदर सरडे, रविंद्र गरड (लिपिक), राजाभाऊ बनसोडे, अशोक कोकणे, देविदास गरड, शिवा थोरबोले, राहुल गरड, श्रीमती उज्ज्वला वनवे, रणजित देशमुख, देशमुख सर आणि मनियार सर यांचा समावेश होता.
रंगतदार स्पर्धांनी वाढवली मेळाव्याची रंगत
स्नेहमेळाव्यानिमित्त मित्र-मैत्रिणींसाठी विविध मनोरंजक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये खालील स्पर्धक विजेते ठरले :
सर्वाधिक ओळखपत्रे — समीर पाटील
सर्वात लांब पट्टा — सागर माने
सर्वाधिक नाणी जवळ असणे — मनिषा कवटे
सोशल मीडियाशिवाय उपस्थित राहिलेला — प्रसन्न रणभोर
मोबाईल बॅटरी ९५ टक्क्यांपेक्षा अधिक — अभिजित बनसोडे
‘तसाच दिसणारा’ पुरस्कार — प्रसाद शेळके
‘सर्वात बदललेला’ मित्र — विकास सुर्यवंशी
वर्गाचा मनोरंजनकर्ता — किर्ती पालके
नेहमी उशिरा येणारा — विशाल कडबने
संगीत खुर्ची (पैठणी स्पर्धा) विजेती — राजश्री इतापे
नियोजनबद्ध आयोजन
कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवराज शिंदे यांनी केले, तर सूत्रसंचालन आशुतोष बनसोडे यांनी केले. हा स्नेहमेळावा यशस्वी करण्यासाठी आशुतोष बनसोडे, सागर सोनवणे, युवराज शिंदे, विकास सुर्यवंशी, समीर पाटील, सागर माने, स्वप्निल बोकेफोडे, अभिजीत बनसोडे, मोबीन सय्यद, अभिलाष सुर्यवंशी, तन्वीर मुजावर, सलमान शेख, विशाल कडबने, प्रसाद शेळके, योगेश भागडे, गजानन साळुंके, रमेश चोरमोले, प्रसन्न रणभोर, किर्ती पालके, ज्योती यादव, राजश्री इतापे, राजश्री शेळके, ज्योती शिंदे, मनिषा कवटे, वंदना बनसोडे आणि पल्लवी बोबडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!