ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे जागतिक परिचारिका दिन साजरा. परिचारिका व परिचारक हे आरोग्य व्यवस्थेचे खरे आधारस्तंभ! Nurses and male nurses are the true pillars of the healthcare system!

उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे जागतिक परिचारिका दिन साजरा.

परिचारिका व परिचारक हे आरोग्य व्यवस्थेचे खरे आधारस्तंभ!

रंगोली न्युज - परंडा दि. १२)

Nurses and male nurses are the true pillars of the healthcare system!
Nurses and male nurses are the true pillars of the healthcare system!

Nurses and male nurses are the true pillars of the healthcare system! धाराशिव जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे दि. १२ रोजी वैद्यकीय अधीक्षक डॉ. जुबेर मोमीन यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक परिचारिका दिन "Nursing Day" मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. 

     यावेळी परिचारिका व परिचारक (Nurses & Brothers) यांच्या आरोग्यसेवेतील अतुलनीय योगदानाचा गौरव करण्यात आला. रुग्णसेवा, मानवसेवा आणि राष्ट्रसेवा या भावनेतून रात्रंदिवस कार्य करणाऱ्या परिचारिका व परिचारकांच्या समर्पित सेवेला यावेळी विशेष अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमात मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आरोग्य व्यवस्था ही केवळ डॉक्टरांवर अवलंबून नसून परिचारिका व परिचारक हे त्याचे अत्यंत महत्त्वाचे, संवेदनशील व भक्कम आधारस्तंभ आहेत. रुग्णालयात दाखल होणाऱ्या प्रत्येक रुग्णाला स्वतःच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे समजून सेवा देण्याची भावना परिचारिका वर्गामध्ये दिसून येते. रुग्णाच्या वेदनेत आधार, भीतीमध्ये धीर आणि उपचार प्रक्रियेत आशा निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य परिचारिका व परिचारक बजावत असतात, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

विशेषतः कोरोना महामारीच्या कठीण काळात परिचारिका व परिचारकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून Frontline Warriors म्हणून बजावलेली भूमिका समाज कधीही विसरू शकणार नाही. PPE किटमध्ये तासन्तास सेवा देत रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांनी केलेले योगदान हे मानवसेवा व राष्ट्रसेवेचे प्रेरणादायी उदाहरण असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.

      भारतीय संस्कृतीतील “रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा” या संकल्पनेचा उल्लेख करताना, “धर्मार्थकाममोक्षाणाम् आरोग्यं मूलमुत्तमम्” या उक्तीप्रमाणे उत्तम आरोग्य हेच धर्म, अर्थ, काम व मोक्ष या चार पुरुषार्थांचे मूळ असल्याचे प्रतिपादन करण्यात आले. डॉक्टर, परिचारिका व परिचारक हे आरोग्यदानाच्या माध्यमातून समाजाला नवजीवन देण्याचे महान कार्य करीत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. जुबेर मोमीन, सह अधीक्षक चंद्रकांत पवार, डॉ. आनंद मोरे, इन्चार्ज सिस्टर श्रीमती शितल कुलकर्णी, श्रीमती सुलोचना कुलकर्णी, श्रीमती सातारकर सिस्टर, श्रीमती गायकवाड सिस्टर, श्रीमती थिटे, श्रीमती दुधकवडे, श्रीमती आयेशा, इमरान शेख तसेच रुग्णालयातील इतर वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, परिचारक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी 

👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

Post a Comment

0 Comments