पाणी आहे, पण वीज नाही; परंडा तालुक्यात ऊसासह इतर पिके संकटात.
गळीत हंगाम २०२५-२६ च्या ऊस बिलासाठी शेतकऱ्यांच्या नशिबात अजूनही प्रतीक्षा.
![]() |
| Water is available, but there is no electricity; sugarcane and other crops in Paranda Taluka are in jeopardy. |
Water is available, but there is no electricity; sugarcane and other crops in Paranda Taluka are in jeopardy. धाराशिव जिल्हा परंडा तालुक्यात शेती पिकांसाठी पाण्याची उपलब्धता असतानाही अपुऱ्या व सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. विहिरी व बोअरवेलमध्ये पाणी असूनही कमी दाबाचा वीजपुरवठा, वारंवार होणारी लाईटची खंडितता "Frequent power outages" आणि अपुरी लाईन क्षमता यामुळे ऊस, केळी तसेच इतर पिकांना वेळेवर पाणी देता येत नसल्याने अनेक ठिकाणी पिके वाळू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहेत.
धाराशिव जिल्ह्यातील मोठा सिनाकोळेगाव प्रकल्प हा परंडा तालुक्यात आहे. तर खसापूरी, चांदणी, साकत मध्यम प्रकल्प पाझर तलाव, बंधारे, शिराळा उपसा सिंचन असलेल्या परंडा तालुक्यात शेती उपयोगी पाणीसाठवण क्षमता उत्तम असल्याने बागायती क्षेत्रामध्ये चांगली वाढ झालेली आहे. त्यात ऊसाचे क्षेत्र चांगलेच वाढलेले आहे. अशा बागायती क्षेत्राला जानेवारीनंतर फेब्रुवारी ते मे या उन्हाळी कालावधीत पिकांना वारंवार पाणी देण्याची गरज असते. सध्या वाढत्या तापमानामुळे ऊसासह इतर पिकांनाही नियमित पाण्याची आवश्यकता आहे. मात्र महावितरणच्या अनियमित कारभारामुळे शेतकऱ्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दिवसाला अवघे पाच तास वीज मिळत असून त्यातही कमी व्होल्टेजमुळे मोटारी व्यवस्थित चालत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या वाट्याला आलेला त्रास म्हणुन की काय? अनेक भागात रात्री लोडशेडींगच्या वेळेतील उशिरा होणारा वीजपुरवठा शेतकऱ्यांना रात्रभर जगारण करण्यास भाग पाडतो. उन्हात दिवसभर शेतात काम करूनही विजेच्या लपंडावामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. या अपुऱ्या विजपुरवठ्याला नेमके कोण जबाबदार, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.
[ ] गळीत हंगाम २०२५-२६ च्या ऊस बिलासाठी अजूनही प्रतीक्षा.
दरम्यान, परंडा तालुक्यातील तसेच तालुक्यालगतच्या साखर कारखान्यांनी गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये मोठ्या प्रमाणात ऊस घेतला. मात्र पुढील गळीत हंगाम अवघ्या सहा महिन्यांवर येऊन ठेपला असतानाही अनेक शेतकऱ्यांना अद्याप पूर्ण ऊस बिल मिळालेले नाही. तर काहींना अर्धवट रक्कम मिळाली असून अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात अजून एक रुपयाही जमा झालेला नाही.
शेती मशागत, खत, बियाणे, नांगरणी, मोगडणी तसेच घरखर्च भागवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उसणवारी करावी लागत आहे. ऊस तोडणीनंतर सहा-सहा महिने बिलासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या प्रश्नाकडे साखर आयुक्त तसेच शेतकरी हितचिंतक लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
[ ] “पाणी असूनही पिकांना देता येत नाही, ही मोठी शोकांतिका आहे. वेळेवर वीज मिळाली नाही तर हातातोंडाशी आलेले ऊसपीक व इतर पिके जळून जाण्याची भीती आहे,” महावितरण प्रशासनाने तातडीने दखल घेऊन वीज लाईनची क्षमता वाढवावी, नियमित वीजपुरवठा करावा तसेच कमी दाबाच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. शेतकरी - गणेश नेटके, भोंजा
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!