ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

सिना कोळेगाव धरणात अद्याप नवीन पाण्याची आवक नाही; जिवंत पाणीसाठा उणे अपुऱ्या पावसामुळे दुबार पेरणीचे संकट; धरणे कोरडी, थकीत ऊस बिलांमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत No fresh water inflow into Sina Kolegaon Dam yet; live water storage is in the negative.

सिना कोळेगाव धरणात अद्याप नवीन पाण्याची आवक नाही; जिवंत पाणीसाठा उणे.

अपुऱ्या पावसामुळे दुबार पेरणीचे संकट; धरणे कोरडी, थकीत ऊस बिलांमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत.

No fresh water inflow into Sina Kolegaon Dam yet; live water storage is in the negative.
No fresh water inflow into Sina Kolegaon Dam yet; live water storage is in the negative.

परंडा, दि. १० (रंगोली न्यूज): No fresh water inflow into Sina Kolegaon Dam yet; live water storage is in the negative. राज्यातील अनेक भागांमध्ये जूनच्या अखेरीस व जुलैच्या सुरुवातीला मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असताना मराठवाडा मात्र अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत "Marathwada, however, is still awaiting rain." आहे. धाराशिव जिल्ह्यासह परंडा तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने सिना कोळेगाव धरणातील पाणीसाठा अत्यंत चिंताजनक स्थितीत पोहोचला आहे. दि. १० जुलैपर्यंत धरणात नवीन पाण्याची कोणतीही आवक झालेली नसून जिवंत पाणीसाठा उणे स्थितीत नोंदविण्यात आला आहे.

धरणाची सद्यस्थिती चिंताजनक

आजच्या अधिकृत अहवालानुसार धरणाची पाणीपातळी ४९८.४९० मीटर असून एकूण पाणीसाठा ५६.७४४ दशलक्ष घनमीटर (२.०० टीएमसी) इतका आहे. मात्र जिवंत पाणीसाठा उणे ४.३९८ दशलक्ष घनमीटर (उणे ०.१५ टीएमसी) इतका असून तो उणे ४.९२ टक्के नोंदविण्यात आला आहे. आज दिवसभरात धरणात ०.०० दशलक्ष घनमीटर नवीन पाण्याची आवक झाली असून कोणताही विसर्ग सुरू नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

गेल्या वर्षाच्या तुलनेत मोठी घसरण

गेल्या वर्षी याच दिवशी सिना कोळेगाव धरणात ४५.६० दशलक्ष घनमीटर (१.६१ टीएमसी) जिवंत पाणीसाठा उपलब्ध होता, जो ५१.०४ टक्के होता. यंदा मात्र परिस्थिती पूर्णपणे उलट असून धरणातील जिवंत पाणीसाठा उणे झाल्याने भविष्यातील पाणीटंचाईची भीती व्यक्त केली जात आहे.

पावसाने दिली हुलकावणी; दुबार पेरणीचे संकट

१ जूनपासून आतापर्यंत सरासरी २०६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असली तरी तो शेती व धरणांसाठी पुरेसा ठरलेला नाही. जूनच्या सुरुवातीला झालेल्या पावसावर विश्वास ठेवून अनेक शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने अनेक ठिकाणी पिके सुकू लागली असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.

मध्यम प्रकल्पही अद्याप रिकामे

परंडा तालुक्यातील सिना कोळेगाव, खासापुरी, चांदणी, साकत यांसह इतर मध्यम प्रकल्पांमध्येही अद्याप क्षमतेनुसार पाणीसाठा झालेला नाही. त्यामुळे खरीप हंगामाबरोबरच आगामी पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

ऊस उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात

एकीकडे अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगाम धोक्यात आला असताना दुसरीकडे मागील गळीत हंगामातील ऊस बिले अद्याप न मिळाल्याने ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. परंडा तालुक्यातील काही साखर कारखाने तसेच माढा तालुक्यातील श्री संत कुर्मदास सहकारी साखर कारखाना लि., स. म. गणपतराव साठेनगर व इतर साखर कारखाने यांच्याकडील थकीत बिलांसाठी अनेक शेतकरी वारंवार कारखान्यांच्या फेऱ्या मारत आहेत. मात्र "लवकरच बिले अदा करू" या आश्वासनाशिवाय त्यांच्या हाती काहीच लागत नसल्याची नाराजी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी

संबंधित साखर कारखान्यांनी किती ऊस गाळप केला, किती शेतकऱ्यांना किती दराने ऊस बिले अदा केली आणि किती रक्कम थकीत आहे, याची साखर आयुक्त कार्यालयाने तातडीने पडताळणी करून थकीत बिले शेतकऱ्यांना मिळवून द्यावीत, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे.

आता सर्वांचे लक्ष पावसाकडे

धरणातील उणे जिवंत पाणीसाठा, अपुरा पाऊस, दुबार पेरणीचे संकट आणि थकीत ऊस बिले या दुहेरी-तिहेरी संकटामुळे परंडा तालुक्यासह संपूर्ण मराठवाड्यातील शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत. आगामी काही दिवसांत समाधानकारक पाऊस झाल्यासच धरणातील पाणीसाठा वाढून खरीप हंगामाला दिलासा मिळण्याची आशा शेतकरी व्यक्त करत आहेत.


आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.

👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!




Post a Comment

0 Comments