ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

मुलाचा पहिला वाढदिवस सामाजिक कार्याने साजरा; काटेवाडी जिल्हा परिषद शाळेला आधुनिक वॉटर फिल्टरची भेट. Son's first birthday celebrated through a social cause; modern water filter gifted to Katewadi Zilla Parishad School.

मुलाचा पहिला वाढदिवस सामाजिक कार्याने साजरा; काटेवाडी जिल्हा परिषद शाळेला आधुनिक वॉटर फिल्टरची भेट

Son's first birthday celebrated through a social cause; modern water filter gifted to Katewadi Zilla Parishad School.
Son's first birthday celebrated through a social cause; modern water filter gifted to Katewadi Zilla Parishad School.

परंडा, दि. १४ (रंगोली न्युज): Son's first birthday celebrated through a social cause; modern water filter gifted to Katewadi Zilla Parishad School. वाढदिवस हा केवळ आनंदोत्सव न राहता समाजोपयोगी कार्यातूनही साजरा करता येतो, याचा आदर्श वस्तुपाठ प्रविण खाडे यांनी घालून दिला. आपल्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी काटेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला आधुनिक वॉटर फिल्टर भेट देऊन विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असा सामाजिक उपक्रम राबवला.

यावेळी शाळेच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात प्रविण खाडे यांच्या हस्ते वॉटर फिल्टरचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मुलाच्या वाढदिवसानिमित्त केक कापून उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी बोलताना प्रविण खाडे म्हणाले, "वाढदिवस साजरा करताना समाजातील गरजू घटकांसाठी काहीतरी करावे, अशी इच्छा होती. शाळेतील विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे."

उन्हाळ्याच्या काळात शाळेतील ३० हून अधिक विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची अडचण भासत होती. आता या आधुनिक वॉटर फिल्टरमुळे विद्यार्थ्यांना शुद्ध व थंड पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असून त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही हा उपक्रम अत्यंत लाभदायक ठरणार आहे.

कार्यक्रमाच्या प्रारंभी इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी साक्षी शिंदे हिने स्वागतगीत सादर केले. शाळेचे मुख्याध्यापक धोंडे यांनी प्रास्ताविक करत या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. तसेच प्रविण खाडे यांना मुलाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत शाळेच्या वतीने देणगीबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

या कार्यक्रमास शिक्षक सुरवसे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दयानंद खाडे, ग्रामस्थ विक्रम खाडे, पांडुरंग खाडे, शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षक सुरवसे यांनी केले.

प्रविण खाडे यांच्या या अभिनव उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत असून, वाढदिवसासारखे वैयक्तिक आनंदाचे क्षण समाजहिताच्या कार्याशी जोडण्याचा हा आदर्श इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.


आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.

👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

Post a Comment

0 Comments