धनादेश अनादर प्रकरणी आरोपीस एक वर्ष सश्रम कारावास व साडेतीन लाखांचा दंड.
![]() |
| Accused sentenced to one year of rigorous imprisonment and a fine of ₹3.5 lakh in a cheque bounce case. |
परंडा, दि. ७ (रंगोली न्यूज) – Accused sentenced to one year of rigorous imprisonment and a fine of ₹3.5 lakh in a cheque bounce case. फिर्यादी भैरवनाथ शुगर वर्क्स लि., सोनारी (ता. परंडा) यांच्या धनादेश अनादर (चेक बाऊन्स) प्रकरणात न्यायालयाने आरोपीस एक वर्ष सश्रम कारावास तसेच ₹3,50,000 द्रव्य दंडाची शिक्षा सुनावली आहे.
प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी कंपनीचे अधिकारी यांनी आरोपीविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीत आरोपीने कारखान्याचे ₹1,77,941 रकमेचा धनादेश दिला होता. मात्र संबंधित धनादेश बँकेत सादर केल्यानंतर तो अनादरित (चेक बाऊन्स) झाला. त्यानंतर फिर्यादीने न्यायालयात दावा दाखल केला होता.
या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने उपलब्ध पुरावे व युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपीस एक वर्ष सश्रम कारावास व ₹3,50,000 दंड अशी शिक्षा सुनावली. तसेच दंडाची रक्कम न भरल्यास आरोपीस अतिरिक्त सहा महिन्यांचा साधा कारावास भोगावा लागेल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
ही शिक्षा दि. २९ जून २०२६ रोजी न्यायालयाने सुनावली. या प्रकरणात फिर्यादी कारखान्याच्या वतीने अॅड. विवेक म. काळे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. तसेच कारखान्याचे प्रतिनिधी शंकर सुगाव नरसाळे, तुळशीराम अंबादास बालगुंडे, श्रावण हरिभाऊ कोकणे आणि प्रल्हाद शेभराव ठोंबरे यांनी आवश्यक सहकार्य केले.
भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेडने याबाबत प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.
👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!