ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

SIR अभियानाच्या कामाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा; कात्राबाद व परंडा शहराला भेट मतदार यादी पुनरीक्षणाचे काम अचूक व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना; अधिकारी-कर्मचाऱ्यांशी साधला संवाद District Collector reviews SIR project work.

SIR अभियानाच्या कामाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा; कात्राबाद व परंडा शहराला भेट

मतदार यादी पुनरीक्षणाचे काम अचूक व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना; अधिकारी-कर्मचाऱ्यांशी साधला संवाद

District Collector reviews SIR project work.
District Collector reviews SIR project work.

परंडा, दि. १० (रंगोली न्यूज): District Collector reviews SIR project work. भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) अभियानांतर्गत सुरू असलेल्या मतदार यादी पुनरीक्षणाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी धाराशिव जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी गुरुवारी (दि. १० जुलै) परंडा तालुक्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी मौजे कात्राबाद तसेच परंडा शहरातील विविध भागांना भेट देऊन सुरू असलेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.

दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी पुजार यांनी मतदार यादी पुनरीक्षणाचे काम प्रत्यक्ष तपासून संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच क्षेत्रीय पातळीवर कार्यरत कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. मतदार नोंदणी, पडताळणी व माहिती अद्ययावत करण्याची प्रक्रिया अचूक, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी मतदार यादीतील प्रत्येक पात्र मतदाराची नोंद अचूकपणे व्हावी, कोणत्याही पात्र नागरिकाचे नाव वगळले जाऊ नये तसेच अपात्र नोंदींची योग्य पडताळणी करून आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या.

जिल्हाधिकाऱ्यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या कामाचा सविस्तर आढावा घेत विविध टप्प्यांवरील प्रगतीची माहिती जाणून घेतली. तसेच अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले.

या पाहणी दौऱ्यात उपविभागीय अधिकारी (भूम) श्रीमती ज्योती चौहान, तहसीलदार निलेश काकडे तसेच परंडा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती मनीषा वडेपल्ली उपस्थित होत्या. संबंधित अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुरू असलेल्या कामाची माहिती देत अभियानाच्या प्रगतीचा अहवाल सादर केला.

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण अभियानाच्या माध्यमातून मतदार याद्या अद्ययावत व त्रुटीमुक्त करण्यावर भर दिला जात असून, पात्र नागरिकांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे आणि निवडणूक प्रक्रियेला अधिक पारदर्शक व विश्वासार्ह बनविण्याच्या दृष्टीने हे अभियान महत्त्वाचे असल्याचे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले.

जिल्ह्यातील सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करून मतदार यादी पुनरीक्षणाचे काम निर्धारित मुदतीत पूर्ण करावे, असे निर्देशही जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी यावेळी दिले.


आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.

👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!


Post a Comment

0 Comments