ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

कर्जमाफीतील जाचक अटी रद्द; शेतकऱ्यांच्या एकजुटीचा व रोहित पवार यांच्या संघर्षाचा विजय – राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) Onerous conditions for loan waivers scrapped; a victory for farmers' unity and Rohit Pawar's struggle – NCP (Sharadchandra Pawar)

कर्जमाफीतील जाचक अटी रद्द; शेतकऱ्यांच्या एकजुटीचा व रोहित पवार यांच्या संघर्षाचा विजय – राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)

Onerous conditions for loan waivers scrapped; a victory for farmers' unity and Rohit Pawar's struggle – NCP (Sharadchandra Pawar)
Onerous conditions for loan waivers scrapped; a victory for farmers' unity and Rohit Pawar's struggle – NCP (Sharadchandra Pawar)

परंडा, दि. ११ (रंगोली न्यूज) : Onerous conditions for loan waivers scrapped; a victory for farmers' unity and Rohit Pawar's struggle – NCP (Sharadchandra Pawar) राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती "Punyashlok Ahilyadevi Holkar Loan Waiver" योजनेतील जाचक अटी रद्द करण्याचा घेतलेला निर्णय हा राज्यातील शेतकऱ्यांच्या एकजुटीचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या सातत्यपूर्ण संघर्षाचा मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करताना शेतकऱ्यांच्या उर्वरित मागण्याही तातडीने पूर्ण कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

राज्य शासनाने २ जून २०२६ रोजी सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांसाठी ३५ हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. मात्र, २०१९ च्या कर्जमाफीची मर्यादा, प्रोत्साहनपर अनुदानासाठी सलग चार वर्षे नियमित कर्जफेडीची अट यांसारख्या जाचक निकषांमुळे ३५ लाखांहून अधिक शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे या अटी रद्द करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) आणि विविध शेतकरी संघटनांनी राज्यभर सातत्याने आंदोलन छेडले होते.

या मागण्यांसाठी पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत एल्गार मोर्चा काढण्यात आला. मुख्यमंत्री आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठका घेण्यात आल्या. विधिमंडळातही या प्रश्नावर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. शासनाला दिलेल्या अल्टिमेटमनंतर अखेर सरकारने माघार घेत कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला.

पक्षाच्या वतीने सांगण्यात आले की, हा विजय कोणत्याही एका पक्षाचा किंवा व्यक्तीचा नसून राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या एकजुटीचा आणि लोकशाही मार्गाने उभारलेल्या संघर्षाचा आहे. जनहिताच्या प्रश्नांवर सातत्याने लढा दिल्यास सरकारलाही निर्णय बदलावा लागतो, हे या आंदोलनातून पुन्हा एकदा सिद्ध झाले असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

तथापि, शेतकऱ्यांचे अनेक महत्त्वाचे प्रश्न अद्यापही प्रलंबित असल्याचे पक्षाने नमूद केले आहे. बीड जिल्ह्यातील २०२० चा पीकविमा अद्याप वितरित झालेला नाही. २०१७ मधील बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाही. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची (मनरेगा) कामांची बिले थकीत आहेत. शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा होत नसल्याने शेतकरी अडचणीत आहेत. तसेच जळालेले ट्रान्सफॉर्मर वेळेत बदलले जात नसल्याने शेतीचे नुकसान होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या सर्व प्रलंबित प्रश्नांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) शेतकरी, विविध शेतकरी संघटना आणि जनतेच्या सहकार्याने राज्यभर व्यापक लोकशाही आंदोलन उभारेल, असा इशाराही पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.

या आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व शेतकरी बांधवांचे, विविध शेतकरी संघटनांचे, सर्वपक्षीय प्रतिनिधींचे, माध्यम प्रतिनिधींचे तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करणाऱ्या पोलीस प्रशासनाचे पक्षाच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.


आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.

👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!


Post a Comment

0 Comments