बावची विद्यालय, परंडा येथे 'उत्तुंगतेज बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षा २०२६'च्या विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव
![]() |
| Felicitation of winning students of the 'Uttungatej Child Scientist Competitive Examination 2026' at Bavchi Vidyalaya, Paranda. |
परंडा, दि. ९ (रंगोली न्युज) : Felicitation of winning students of the 'Uttungatej Child Scientist Competitive Examination 2026' at Bavchi Vidyalaya, Paranda. बावची विद्यालय, परंडा येथे गुरुवार, दि. ९ जुलै रोजी 'उत्तुंगतेज बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षा २०२६' मध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमास उत्तुंगतेज बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षा फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष रामेश्वर हालगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी विद्यालयातील कु. संस्कृती देवकर, कु. सिद्धी गरड, कु. प्राप्ती सातपुते, कु. राजनंदिनी शिंदे, कु. तन्मय शिंदे आणि कु. श्रेयस काळे या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यापैकी कु. संस्कृती देवकर, कु. सिद्धी गरड आणि कु. तन्मय शिंदे या विद्यार्थ्यांची ISRO, IIT आणि Science City येथे आयोजित करण्यात येणाऱ्या विनामूल्य शैक्षणिक अभ्यासदौऱ्यासाठी निवड झाल्याने त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या या यशामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी भर पडली असून विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कार्यक्रमादरम्यान विद्यालयाच्या वतीने प्रमुख पाहुणे रामेश्वर हालगे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
आपल्या मनोगतात रामेश्वर हालगे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे, आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाची ओळख करून देणे आणि त्यांना भविष्यात शास्त्रज्ञ होण्यासाठी प्रेरित करणे हा फाउंडेशनचा प्रमुख उद्देश असल्याचे सांगितले. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त लाभ घेतला.
या कार्यक्रमास प्रमोद डोके, विकास वाघमारे, संदीप अनभुले, प्रभाकर मिरगणे, कु. कोमल करळे, कु. पूजा रोडगे यांच्यासह विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शुभम रोडगे यांनी केले.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.
👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!