बावची विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्त्व विकास व शैक्षणिक समुपदेशन कार्यक्रम उत्साहात संपन्न.
![]() |
| A personality development and educational counseling program for students was successfully and enthusiastically held at Bavchi Vidyalaya. |
परंडा, दि. ११ (रंगोली न्यूज) : A personality development and educational counseling program for students was successfully and enthusiastically held at Bavchi Vidyalaya. बावची विद्यालय, परंडा येथे इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्त्व विकास व शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने समुपदेशन कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सकारात्मक विचार आणि अभ्यासाविषयीची प्रेरणा निर्माण करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमात संदीप अनभुले यांनी "ध्येय निर्धारण व नियोजन" "Goal Setting and Planning" तसेच "चांगल्या सवयी आणि नैतिक मूल्ये" या विषयांवर विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. यशस्वी होण्यासाठी स्पष्ट ध्येय, योग्य नियोजन आणि चांगल्या सवयींचे महत्त्व त्यांनी उदाहरणांसह पटवून दिले.
सुरज वळवी यांनी "अभ्यास कौशल्य" आणि "आरोग्याच्या चांगल्या सवयी" या विषयांवर मार्गदर्शन करत प्रभावी अध्ययन पद्धती, वेळेचे व्यवस्थापन आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
तसेच सिद्धोधन घोगरे यांनी "उत्तम व्यक्तिमत्त्व कसे घडवावे" या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करत आत्मविश्वास, शिस्त, सकारात्मक विचार आणि सुसंस्कारित वर्तन या गुणांचा जीवनातील यशासाठी असलेला महत्त्वपूर्ण वाटा विद्यार्थ्यांसमोर प्रभावीपणे मांडला.
विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेत विविध प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले. या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना आपल्या ध्येयपूर्तीसाठी योग्य दिशा, प्रेरणा आणि आत्मविश्वास मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
या उपक्रमाचे नियोजन संदीप अनभुले व अक्षय साळवे यांनी केले. यावेळी विद्यालयाचे प्रमोद डोके, विकास वाघमारे आणि सचिन लावंड यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी समाधान व्यक्त केले.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.
👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!