ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

वंचित दिव्यांग व्यक्तीला मिळाले आधारकार्ड; प्रशासनाच्या पुढाकारामुळे शासकीय योजनांचा मार्ग मोकळा Marginalized person with a disability receives Aadhaar card; administrative initiative paves the way for access to government schemes.

वंचित दिव्यांग व्यक्तीला मिळाले आधारकार्ड; प्रशासनाच्या पुढाकारामुळे शासकीय योजनांचा मार्ग मोकळा

Marginalized person with a disability receives Aadhaar card; administrative initiative paves the way for access to government schemes.
Marginalized person with a disability receives Aadhaar card; administrative initiative paves the way for access to government schemes.

परंडा, दि. १४ (रंगोली न्यूज): Marginalized person with a disability receives Aadhaar card; administrative initiative paves the way for access to government schemes. परंडा तालुक्यातील आसू येथील रहिवासी व दिव्यांग असलेले ३५ वर्षीय शंकर नामानाथ मासाळ यांना अनेक वर्षांपासून आधारकार्ड मिळत नसल्याने विविध शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागत होते. मात्र तहसील प्रशासनाच्या संवेदनशील पुढाकारामुळे अखेर त्यांना आधारकार्ड मिळाले असून शासकीय योजनांचा लाभ घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शंकर मासाळ हे दिव्यांग असल्याने त्यांच्या बोटांचे ठसे उमटत नव्हते तसेच डोळ्यांचे (रेटिना) स्कॅनही होत नसल्यामुळे त्यांचे आधारकार्ड तयार होऊ शकत नव्हते. त्यांनी अनेक प्रयत्न करूनही आधारकार्ड मिळत नसल्याने विविध शासकीय लाभांपासून ते वंचित राहिले होते.

दि. ७ मार्च २०२६ रोजी आसू येथे आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिरात' ग्रामस्थांनी तहसीलदार निलेश काकडे यांच्याकडे ही समस्या मांडली. संबंधित व्यक्ती दिव्यांग व निराधार असल्याने त्यांना आधारकार्ड मिळवून देऊन शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

तहसीलदार निलेश काकडे यांनी या प्रकरणाची सहानुभूतीपूर्वक दखल घेत आधार केंद्र चालकांना आवश्यक सूचना व मार्गदर्शन केले. त्यानुसार विशेष प्रयत्न करून शंकर मासाळ यांचे आधारकार्ड तयार करण्यात आले.

दि. १४ जुलै २०२६ रोजी उपविभागीय अधिकारी ज्योती चव्हाण यांच्या हस्ते तहसील कार्यालय, परंडा येथे शंकर मासाळ यांना आधारकार्डाचे वितरण करण्यात आले.

आधारकार्ड तयार करण्याच्या प्रक्रियेत तहसीलदार निलेश काकडे, नायब तहसीलदार पूजा गोरे, नितीन भांडवलकर, जगन्नाथ खुने, महावीर इदापे (पोलीस पाटील), ग्रामस्थ तसेच आधार केंद्र चालक शहा यांचे सहकार्य लाभल्याचे प्रेसनोटमध्ये नमूद करण्यात आले.


आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.

👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

Post a Comment

0 Comments