ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

परंडा येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या निष्ठावंत शिवसैनिकांची आढावा बैठक संपन्न. A review meeting of loyal Shiv Sainiks of the Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) party was held at Paranda.

परंडा येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या निष्ठावंत शिवसैनिकांची आढावा बैठक संपन्न.

A review meeting of loyal Shiv Sainiks of the Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) party was held at Paranda.
A review meeting of loyal Shiv Sainiks of the Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) party was held at Paranda.

परंडा, दि. २५ (रंगोली न्यूज) – A review meeting of loyal Shiv Sainiks of the Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) party was held at Paranda. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या परंडा शहरातील निष्ठावंत शिवसैनिकांची आढावा बैठक मंगळवार दि. २४ जून रोजी शासकीय विश्रामगृह, परंडा येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीस पक्षाचे धाराशिव जिल्हाप्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधत संघटनात्मक बांधणी व आगामी राजकीय घडामोडींवर मार्गदर्शन केले.

बैठकीदरम्यान परंडा शहरातील शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पक्षनिष्ठेचा पुनरुच्चार केला. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी आपण कायम पक्षप्रमुख मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षासाठी कार्यरत राहणार असल्याचे सांगितले. तसेच जिल्हाप्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघटना अधिक मजबूत करण्यासाठी कटिबद्ध राहू व पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना जनतेच्या माध्यमातून धडा शिकवू, अशी ग्वाही दिली.

यावेळी युवा नेते विश्वजीत ज्ञानेश्वर पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने गावपातळीपासून शहरपातळीपर्यंत सक्रिय राहण्याचे आवाहन केले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक तयारी, जनसंपर्क वाढविणे आणि पक्षाची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी एकजुटीने काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

जिल्हाप्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांनीही कार्यकर्त्यांशी संवाद साधताना शिवसेना पक्षाची परंपरा, संघर्षाची भूमिका आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांचे योगदान यावर प्रकाश टाकला. पक्षाच्या बळकटीसाठी प्रत्येक शिवसैनिकाने जनतेमध्ये जाऊन पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडावी, असे आवाहन त्यांनी केले.

या बैठकीस शहरप्रमुख रईस मुजावर, युवासेना शहरप्रमुख प्रितम डाके, माजी नगराध्यक्ष शिवाजी मेहेर, माजी नगराध्यक्ष सुभाष शिंदे, माजी उपनगराध्यक्ष इस्माईल कुरेशी, परंडा नगरपरिषदेचे गटनेते अनिल शिंदे, नगरसेवक मन्नान बासले, अब्बास मुजावर, मजहर दहेलूज, सोमनाथ अलबते, सत्तार पठाण, आकीब पठाण, माजी नगरसेवक विनोद साळवे, संजय कदम, खलील (चाचा) पठाण, बाजार समिती संचालक जावेद बागवान, ॲड. अनिकेत काशीद, सोशल मीडिया समन्वयक प्रशांत गायकवाड यांच्यासह दत्तात्रय धनवे, बाबा कुरेशी, कुणाल जाधव, काशीम तुटके, जमील जिकरे, राहुल देवळे, तुकाराम गायकवाड, दत्ता मेहेर, प्रकाश सोनवणे, नागनाथ सुतार, सुरेश पालके, पृथ्वीराज पाटील, अभिलाष सूर्यवंशी, दत्ता जाधव, मोहसीन कुरेशी, बिलाल कुरेशी, रफिक मुजावर, एजाज मुजावर, साबेर मुजावर, लतिफ कुरेशी, सलीम मुजावर, सरवर पठाण, शाहरुख मुजावर, हुसेन शेख, ताहेर मुजावर, गजानन गायकवाड, मुख्तार हावरे, अरबाज बागवान, सचिन शिंदे, सुरेश वाघमारे, अशोक कडबणे, राजू काबळे, ऋषिकेश गायकवाड, शुभम ऐतवाडे, शरद डोरले, ओम माळी, संतोष गंवडी, विकास साळुंके, रविकिरण चैतन्य, अभय पाटील, दिनेश बेळगावकर, औदुंबर पाटील, पिंटू वाघमारे, भैय्या वाघमारे, शंकर शिंदे, बनी शिंदे, आकाश शिंदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीमुळे परंडा शहरातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संघटनात्मक हालचालींना नवचैतन्य मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे कार्यकर्ते अधिक जोमाने कामाला लागणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.

👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

Post a Comment

0 Comments