राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
RPI पक्ष कार्यालय, परंडा येथे अभिवादन.
![]() |
| Birth anniversary of Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj celebrated with enthusiasm. |
परंडा, दि. २७ (रंगोली न्यूज) : Birth anniversary of Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj celebrated with enthusiasm. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) पक्ष कार्यालय, परंडा येथे दि. २६ जून रोजी सामाजिक न्यायाचे प्रणेते, लोककल्याणकारी राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात व आदरपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी शाहू महाराजांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि लोकहितवादी कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा समाजात प्रसार करण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस संजयकुमार बनसोडे, फकीरदादा सुरवसे, तालुकाध्यक्ष दादासाहेब सरवदे, सोशल मीडिया आयटी सेल जिल्हाध्यक्ष आकाश बनसोडे, तसेच बाबा गायकवाड, विकास गोमासे, भारत धेंडे, बापू हावळे, गौतम अडाळे, राजाभाऊ आढाळे, अनिल आधारे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी गोरगरीब, वंचित, शोषित आणि कष्टकरी समाजाला न्याय, शिक्षण व समानतेचा अधिकार मिळवून देण्यासाठी आयुष्यभर कार्य केले. त्यांच्या सामाजिक न्यायाच्या विचारांची आजही समाजाला नितांत गरज असून, त्यांचे कार्य प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.
कार्यक्रमाचा समारोप राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याला अभिवादन करून आणि त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करत करण्यात आला.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.
👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!