ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

बावची विद्यालयात शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा गौरव. Scholarship-holding students and their guiding teachers felicitated at Bavchi Vidyalaya.

बावची विद्यालयात शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा गौरव.

Scholarship-holding students and their guiding teachers felicitated at Bavchi Vidyalaya.
Scholarship-holding students and their guiding teachers felicitated at Bavchi Vidyalaya.

परंडा, दि. ६ (रंगोली न्यूज): Scholarship-holding students and their guiding teachers felicitated at Bavchi Vidyalaya. बावची विद्यालय, परंडा येथे इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा गौरव "Felicitating students eligible for scholarships and the teachers who guided them." सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. याच कार्यक्रमात उत्तुंगतेज बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षेतील विजेत्या विद्यार्थ्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य नारायण खैरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून परंडा केंद्राचे नवनिर्वाचित केंद्रप्रमुख नितीन बोराडे व प्रशांत माने उपस्थित होते. स्पर्धा परीक्षेद्वारे केंद्रप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल नितीन बोराडे यांचा प्राचार्य नारायण खैरे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यानंतर इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी ठरलेल्या एकूण ३९ विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. तसेच उत्तुंगतेज बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षेतील विजेते तन्मय बालाजी शिंदे, संस्कृती समाधान देवकर आणि सिद्धी सचिन गरड यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरापर्यंत पोहोचविण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व मार्गदर्शक शिक्षकांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना केंद्रप्रमुख नितीन बोराडे यांनी विद्यालयातील शैक्षणिक गुणवत्ता, शिस्त, स्पर्धा परीक्षांची तयारी आणि विविध उपक्रमांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर मोठी स्वप्ने साकार करावीत, असे आवाहन त्यांनी केले.

प्राचार्य नारायण खैरे यांनी विद्यालयात राबविण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती, नवोदय, विविध स्पर्धा परीक्षा आणि गुणवत्ता विकास उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांचे परिश्रम, पालकांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांची चिकाटी हेच यशाचे खरे सूत्र असल्याचे सांगत त्यांनी गुणवंत विद्यार्थी, पालक आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास वाघमारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन शुभम रोडगे यांनी मानले. कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.

👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

Post a Comment

0 Comments