ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

खरीप हंगाम २०२६ पूर्वतयारीसाठी डोमगाव येथे कृषी आढावा बैठक; शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन. Agricultural Review Meeting Held at Domgaon for Kharif Season 2026 Preparations; Farmers Guided on Modern Farming Techniques.

खरीप हंगाम २०२६ पूर्वतयारीसाठी डोमगाव येथे कृषी आढावा बैठक; शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन.

Agricultural Review Meeting Held at Domgaon for Kharif Season 2026 Preparations; Farmers Guided on Modern Farming Techniques.
Agricultural Review Meeting Held at Domgaon for Kharif Season 2026 Preparations; Farmers Guided on Modern Farming Techniques.

रंगोली न्युज - परंडा दि. १३) 

Agricultural Review Meeting Held at Domgaon for Kharif Season 2026 Preparations; Farmers Guided on Modern Farming Techniques. धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुका कृषी अधिकारी नानासाहेब लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १३ मे रोजी डोमगाव ता. परंडा येथे खरीप हंगाम २०२६ पूर्वतयारीच्या अनुषंगाने कृषी आढावा बैठकीचे आयोजन "Agricultural Review Meeting Organized in Preparation for the 2026 Kharif Season" करण्यात आले. या बैठकीत शेतकऱ्यांना खरीप हंगामातील विविध पिकांच्या नियोजनाबाबत तसेच आधुनिक शेती तंत्रज्ञानाविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

बैठकीत पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांनी दर्जेदार व प्रमाणित बियाण्यांची निवड करावी, बियाण्यांची उगवण क्षमता तपासूनच पेरणी करावी तसेच बीज प्रक्रिया केल्यास पिकांचे रोगांपासून संरक्षण होऊन उत्पादनात वाढ होते, असे सांगण्यात आले. माती परीक्षण अहवालाच्या आधारे खतांचे संतुलित नियोजन करणे आवश्यक असून त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहण्यास मदत होते, असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

तसेच कीटकनाशके फवारणी 'Pesticide Spraying' करताना शेतकऱ्यांनी मास्क, हातमोजे, गॉगल यांसारख्या सुरक्षा साहित्याचा वापर करावा, फवारणीदरम्यान आरोग्याची विशेष काळजी घ्यावी व रासायनिक औषधांचा अतिरेक टाळावा, असे आवाहन करण्यात आले. जलतारा योजनेअंतर्गत पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्याबाबतही माहिती देण्यात आली.

यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी व्ही. एन. भाग्यवंत यांनी ऊस पाचरट व्यवस्थापन, उन्हाळ्यात फळबागा टिकवण्यासाठी ठिबक सिंचन, आच्छादन पद्धती, झाडांना आवश्यक अन्नद्रव्य व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले. बदलत्या हवामान परिस्थितीत शेतकऱ्यांनी हवामान अंदाज लक्षात घेऊन पिकांचे नियोजन करावे, असेही सांगण्यात आले.

यावेळी मंडळ कृषी अधिकारी एस. के. माळी, उप कृषी अधिकारी बी. एन. हांगे, किरण शिंदे, बापू मिस्कीन, भाऊराव मिस्कीन, रतिलाल मिस्कीन आदी उपस्थित होते. कार्यक्रमास डोमगाव परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध कृषी विषयांवर चर्चा केली.



आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी 

👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

Post a Comment

0 Comments