धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त उपजिल्हा रुग्णालयात अभिवादन कार्यक्रम उत्साहात.
![]() |
| Enthusiastic Tribute Ceremony Held at the Sub-District Hospital on the Occasion of Dharmaveer Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti |
परंडा, दि. १४ (रंगोली न्युज)
Enthusiastic Tribute Ceremony Held at the Sub-District Hospital on the Occasion of Dharmaveer Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti उपजिल्हा रुग्णालय, परंडा येथे हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, धर्मवीर, शौर्य व स्वाभिमानाचे प्रतीक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व प्रतिमा पूजन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनकार्याला अभिवादन करताना त्यांच्या शौर्य, राष्ट्रनिष्ठा, स्वाभिमान, विद्वत्ता आणि धर्मरक्षणासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. संभाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धे नव्हते, तर विद्वान, न्यायप्रिय आणि स्वराज्य रक्षणासाठी अखंड संघर्ष करणारे युगपुरुष होते, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
कार्यक्रमास वैद्यकीय अधीक्षक डॉ. जुबेर मोमीन, सहाय्यक अधीक्षक चंद्रभान पवार, डॉ. गजानन शेटे, डॉ. आनंद मोरे, समुपदेशक तानाजी गुंजाळ, अमोल वांबुरकर, अजय वैद्य, इन्चार्ज सिस्टर श्रीमती सुलोचना केसकर, श्रीमती थिटे सिस्टर, श्रीमती सुर्वेकर सिस्टर, अमोल शिंदे, सोहेल शेख तसेच रुग्णालयातील इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थितांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांचा आदर्श घेऊन कर्तव्यनिष्ठा, सेवाभाव, राष्ट्रप्रेम व समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. तसेच “रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा” मानून प्रामाणिक व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्याची भावना अधिक दृढ करण्याचे आवाहन करण्यात आले.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!