कांदा झाला कवडीमोल; कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्या! - छावा संघटनेची मागणी
![]() |
| Onion Prices Hit Rock Bottom; Provide Subsidies to Onion-Growing Farmers! — Chhava Organization Demands |
परंडा, दि. १४ (रंगोली न्युज)
Onion Prices Hit Rock Bottom; Provide Subsidies to Onion-Growing Farmers! — Chhava Organization Demands गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यातून शेतकरी अजूनही सावरलेला नाही. त्यातच कांद्याला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. कांदा पिकाला हमीभाव द्यावा तसेच कवडीमोल भावाने विक्री झालेल्या कांद्यास तातडीने अनुदान जाहीर करावे, अन्यथा छावा संघटना व परंडा तालुक्यातील सकल शेतकरी यांच्या वतीने दि. २८ मे २०२६ रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर परंडा-करमाळा रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
शेतकरी राजा मोठ्या कष्टाने कांदा पिकवत असताना बाजारात त्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. बी-बियाणे, खते आणि औषधांच्या वाढलेल्या किंमतीमुळे उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असतानाही बाजारात कांद्याला अत्यल्प दर मिळत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. चांगला भाव मिळून आर्थिक परिस्थिती सुधारेल, या अपेक्षेने घेतलेले कांदा पीक कवडीमोल दरात विकण्याची वेळ आज शेतकऱ्यांवर आली असल्याची खंत निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
राज्यातील काही शेतकरी योग्य भाव मिळत नसल्यामुळे मानसिक तणावाखाली येऊन उत्पादित केलेला कांदा जाळून टाकत असल्याच्या घटना घडत असून, ही परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सदर निवेदनाची प्रत माहितीस्तव कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री धाराशिव जिल्हा, जिल्हाधिकारी धाराशिव, तहसीलदार परंडा, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था धाराशिव, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था परंडा, कृषी उत्पन्न बाजार समिती परंडा तसेच पोलीस स्टेशन परंडा यांना देण्यात आली आहे.
यावेळी छावा संघटनेचे मराठवाडा संपर्क प्रमुख अमर भाई शेख, जिल्हा उपाध्यक्ष आकाश नारायण जेधे, तालुका अध्यक्ष सुधीर लटके, माजी सरपंच पंडीत जगदाळे, शहर उपाध्यक्ष हरिभाऊ आदमीले, संतोष गरड, श्रीमंत गरड, पांडुरंग गरड, बापू धनवे, सुनील सातपुते, सचिन गायकवाड, ज्ञानेश्वर गाडवे, फकिरा सुरवसे, गजानन सुरवसे, संदिप गरड, देविदास गरड, कालिदास गरड, शंकर सुकले, धनंजय गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड, शहाजी कुदळे आदी पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!