सराफ सुवर्णकार संरक्षण समितीच्या नवीन नियुक्त्या जाहीर
परंडा तालुका अध्यक्षपदी सुरेश श्रीहरी बागडे यांची निवड
![]() |
| New Appointments for the Jewellers and Goldsmiths Protection Committee Announced |
परंडा, दि. १५ (रंगोली न्युज) :
New Appointments for the Jewellers and Goldsmiths Protection Committee Announced सराफ सुवर्णकार संरक्षण समितीच्या प्रदेशाध्यक्ष उमेश बोराडे यांच्या आदेशानुसार तसेच धाराशिव जिल्हाध्यक्ष मधुकर शेळके यांच्या सूचनेनुसार धाराशिव जिल्ह्यातील विविध तालुक्यांसाठी नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
सुवर्णकार समाजाच्या व्यावसायिक, सामाजिक व कायदेशीर प्रश्नांना न्याय मिळवून देणे, संघटनेची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवणे तसेच समाज बांधवांना संघटित करण्याच्या उद्देशाने या नियुक्त्या करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
या नियुक्त्यांमध्ये परंडा तालुका अध्यक्षपदी सुरेश श्रीहरी बागडे यांची निवड करण्यात आली असून तुळजापूर तालुका अध्यक्षपदी मंगेश हरि दीक्षित, वाशी तालुका अध्यक्षपदी दादासाहेब प्रभाकर वेदपाठक तसेच धाराशिव तालुका उपाध्यक्षपदी प्रवीण मधुकर जेरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे सुवर्णकार समाजाच्या विविध प्रश्नांवर प्रभावीपणे काम होईल तसेच संघटना अधिक मजबूत होण्यास मदत मिळेल, असा विश्वास जिल्हाध्यक्ष मधुकर शेळके यांनी व्यक्त केला.
यावेळी सराफ सुवर्णकार संरक्षण समितीचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!