ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

परंडा शहरातील किल्ला मार्गावरील अतिक्रमण हटवले; नगर परिषदेकडून मोठी कारवाई Encroachments Removed from Fort Road in Paranda City; Major Action Taken by Municipal Council

परंडा शहरातील किल्ला मार्गावरील अतिक्रमण हटवले; नगर परिषदेकडून मोठी कारवाई

Encroachments Removed from Fort Road in Paranda City; Major Action Taken by Municipal Council
Encroachments Removed from Fort Road in Paranda City; Major Action Taken by Municipal Council

परंडा दि. १५ (रंगोली न्युज) – 

Encroachments Removed from Fort Road in Paranda City; Major Action Taken by Municipal Council धाराशिव जिल्ह्यातील परंडा शहरातील ऐतिहासिक भूईकोट किल्ल्याकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर तसेच मंडई पेठ (चिंचेखालील) परिसरातील सार्वजनिक रस्ते व मोकळ्या जागांवरील अतिक्रमण हटविण्याची मोठी मोहीम नगर परिषद प्रशासनाकडून गुरुवारी सकाळी राबविण्यात आली. सकाळी सुमारे १०:३० वाजल्यापासून या कारवाईला सुरुवात करण्यात आली.

परंडा शहराची ऐतिहासिक ओळख असलेल्या भूईकोट किल्ल्याकडे जाणाऱ्या मार्गालगत अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. रस्त्याच्या दुतर्फा हातगाडे, टपऱ्या तसेच इतर अनधिकृत बांधकामांमुळे पर्यटक, नागरिक आणि वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. विशेषतः मंडई पेठ परिसरात वाहतुकीची सतत कोंडी होत असल्याने नागरिकांकडून वारंवार तक्रारी केल्या जात होत्या.

नगर परिषद परंडा प्रशासनाने यापूर्वी संबंधित अतिक्रमण धारकांना नोटीस देऊन स्वखर्चाने व स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन केले होते. तसेच अन्यथा नगर परिषदेकडून कारवाई करून मुद्देमाल जप्त करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला होता.

त्या अनुषंगाने गुरुवारी प्रशासनाने प्रत्यक्ष कारवाई करत किल्ला रोड परिसरातील अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली. यावेळी नगर परिषद मुख्याधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.

परंडा शहरातील मंडई पेठ ही पिढ्यानपिढ्या जुनी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून दुकानांसमोर हातगाडे व टपऱ्या लावून रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आले होते. त्यामुळे अवजड वाहनांची वाहतूक करताना मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या. या कारवाईमुळे आता किल्ल्याकडे जाणारा मार्ग मोकळा होणार असून वाहतुकीतील अडथळे कमी होण्यास मदत होणार आहे.


आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी 

👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!


Post a Comment

0 Comments