ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

सोनारी येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद. सोनारीत महसूल समाधान शिबिर संपन्न; २४२ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ. Spontaneous Response to the Chhatrapati Shivaji Maharaj Revenue Grievance Redressal Camp at Sonari.

सोनारी येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

सोनारीत महसूल समाधान शिबिर संपन्न; २४२ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ.

Spontaneous Response to the Chhatrapati Shivaji Maharaj Revenue Grievance Redressal Camp at Sonari.
Spontaneous Response to the Chhatrapati Shivaji Maharaj Revenue Grievance Redressal Camp at Sonari.

परंडा - दि. १६ (रंगोली न्युज) : 

Spontaneous Response to the Chhatrapati Shivaji Maharaj Revenue Grievance Redressal Camp at Sonari. सोनारी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये तहसीलदार निलेश काकडे यांच्या अध्यक्षतेखाली सोनारी मंडळातील “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर” शुक्रवार दि. १५ मे २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाले. शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या शिबिरामध्ये नागरिकांना विविध महसुली दाखले व शासकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. यामध्ये उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलयर प्रमाणपत्र, डिजिटल ७/१२ उतारे, डिजिटल ८-अ उतारे, प्रधानमंत्री किसान निधीविषयी माहिती, शिधापत्रिका वाटप, आधार अपडेट तसेच पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला. या उपक्रमांतर्गत एकूण २४२ लाभार्थ्यांनी शिबिराचा लाभ घेतला.

Spontaneous Response to the Chhatrapati Shivaji Maharaj Revenue Grievance Redressal Camp at Sonari.
Spontaneous Response to the Chhatrapati Shivaji Maharaj Revenue Grievance Redressal Camp at Sonari.

शिबिराला सुमारे ५०० ते ६०० नागरिकांची उपस्थिती लाभली. मंडळातील १४ गावांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. यावेळी तालुका कृषी अधिकारी नानासाहेब लांडगे, मकरंद (पंकज) पाटील, परमेश्वर मांडववे, मिलिंद पराळे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाधिकारी दुर्गाप्पा पवार यांनी केले. तसेच सोनारी मंडळाधिकारी एस. के. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी ग्राम महसूल अधिकारी अत्तार एम. ई., दुधाळ, वानखेडे, तोडकरी, शिंदे, सायली शिंदे यांच्यासह सर्व ग्रामसेवक व महसूल कर्मचारी उपस्थित होते. विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांना आवश्यक सेवा व सुविधा पुरविल्या.

Spontaneous Response to the Chhatrapati Shivaji Maharaj Revenue Grievance Redressal Camp at Sonari.
Spontaneous Response to the Chhatrapati Shivaji Maharaj Revenue Grievance Redressal Camp at Sonari.

शिबिरामध्ये एकूण २३ अर्ज प्राप्त झाले असून सर्व अर्ज निकाली काढण्यात आले. नागरिकांना ५५ डिजिटल ७/१२ उतारे, ४३ डिजिटल ८-अ उतारे तसेच ३५३ विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच २४ नागरिकांना सिंगल विंडो क्लिअरन्स अंतर्गत लाभ देण्यात आला.

याशिवाय गाव नमुना दुरुस्ती, अद्ययावत फेरफार, भूमिहक्क नोंदी, रास्तभाव दुकान परवाने, संजय गांधी निराधार योजना, आधार कार्ड सेवा आदी विविध विभागांच्या सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या.

महसूल विभागाच्या सेवा थेट गावपातळीवर उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. अशा शिबिरांमुळे सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ अधिक सुलभपणे मिळत असल्याचे तहसील प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी 

👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

Post a Comment

0 Comments