ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

परंडा तहसिल कार्यालयात २०२७ डिजिटल जनगणना साहित्याचे वाटप; तालुक्यात २५६ प्रगणक व पर्यवेक्षक सज्ज. देशातील पहिल्या डिजिटल जनगणनेसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण; ‘घरयादी व घरगणना’ मोहिमेला वेग. Distribution of 2027 Digital Census materials at the Paranda Tehsil Office; 256 enumerators and supervisors in the taluka are ready.

परंडा तहसिल कार्यालयात २०२७ डिजिटल जनगणना साहित्याचे वाटप; तालुक्यात २५६ प्रगणक व पर्यवेक्षक सज्ज.

देशातील पहिल्या डिजिटल जनगणनेसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण; ‘घरयादी व घरगणना’ मोहिमेला वेग.

Distribution of 2027 Digital Census materials at the Paranda Tehsil Office; 256 enumerators and supervisors in the taluka are ready.
Distribution of 2027 Digital Census materials at the Paranda Tehsil Office; 256 enumerators and supervisors in the taluka are ready.

परंडा – दि. १६ (रंगोली न्यूज) : 

Distribution of 2027 Digital Census materials at the Paranda Tehsil Office; 256 enumerators and supervisors in the taluka are ready. देशातील १६ वी भारतीय जनगणना ही पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणार "The Indian Census will be conducted entirely digitally."  असून, या पार्श्वभूमीवर परंडा तहसिल कार्यालयात तालुक्यातील प्रगणक, पर्यवेक्षक तसेच जनगणना कार्यात सहभागी अधिकारी-कर्मचाऱ्यांना आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. तहसिलदार निलेश काकडे यांच्या हस्ते शुक्रवार (दि. १५) हा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी उपजिल्हाधिकारी (परि.) श्रीम. पूनम पाटील, नायब तहसिलदार विजयकुमार बाडकर, नायब तहसिलदार श्रीम. पूजा गोरे, नायब तहसिलदार मिलिंद पराळे, जनगणना पर्यवेक्षक, जनगणना नियंत्रण कक्ष टीम तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

देशातील पहिली डिजिटल जनगणना 'The country's first digital census' म्हणून ओळख मिळणाऱ्या २०२७ च्या जनगणनेसाठी प्रशासनाने व्यापक तयारी सुरू केली आहे. जनगणना प्रक्रिया दोन टप्प्यांत राबविण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात ‘घरयादी व घरगणना’ (House Listing) हे काम हाती घेण्यात आले आहे. या अंतर्गत प्रत्येक घराची माहिती, घरांची स्थिती तसेच उपलब्ध मूलभूत सुविधा यांची नोंद केली जाणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात फेब्रुवारी २०२७ मध्ये प्रत्यक्ष लोकसंख्या गणना करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, यावेळी कागदी अर्जाऐवजी शासनाने विकसित केलेल्या विशेष मोबाईल ॲपच्या माध्यमातून माहिती संकलित केली जाणार आहे. त्यामुळे माहिती अधिक अचूक, सुरक्षित आणि जलद गतीने संकलित होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

तालुक्यात या राष्ट्रीय कार्यासाठी एकूण २५६ प्रगणक व पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना डिजिटल प्रणाली हाताळण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात घराचे स्वरूप (कच्चे अथवा पक्के), पिण्याच्या पाण्याची सुविधा, वीजपुरवठा, शौचालयाची उपलब्धता, स्वयंपाकासाठी वापरले जाणारे इंधन तसेच कुटुंबाकडे असलेली मालमत्ता जसे सायकल, दुचाकी, कार, टीव्ही, इंटरनेट सुविधा आदींबाबत सुमारे १ ते ३३ प्रश्न विचारले जाणार आहेत.

जनगणना टप्पा क्रमांक १ अंतर्गत घरांची यादीकरण व मूलभूत माहिती संकलनाचे काम नियोजनबद्ध पद्धतीने सुरू करण्यात येत असून, नागरिकांनी अधिकृत कर्मचाऱ्यांना योग्य माहिती देऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

जनगणना ही देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असल्याने प्रत्येक नागरिकाने यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.


आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी 

👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

Post a Comment

0 Comments