कल्याणसागर विद्यालय परंडाचा दहावीचा निकाल ९८.३८ टक्के.
प्रांजली हगवणे तालुक्यात द्वितीय; गणित विषयात दोन विद्यार्थ्यांना शंभर पैकी शंभर गुण.
![]() |
| Kalyansagar Vidyalaya, Paranda, records a Class 10 result of 98.38%. |
रंगोली न्युज - परंडा दि. १० : Kalyansagar Vidyalaya, Paranda, records a Class 10 result of 98.38%. कल्याणसागर माध्यमिक विद्यालय, परंडा येथील मार्च २०२६ इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल ९८.३८ टक्के लागला असून विद्यालयाने उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. यामध्ये विशेष प्राविण्यासह ३२.७८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून प्रथम श्रेणीत ३६.०६ टक्के, द्वितीय श्रेणीत २४.५९ टक्के तर पास श्रेणीत ६.५५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
विद्यालयातील दोन विद्यार्थ्यांनी गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवत विशेष यश संपादन केले आहे. तसेच विद्यालयातील कु. प्रांजली सचिन हगवणे हिने ९८.८० टक्के गुण मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला असून तालुक्यात द्वितीय येण्याचा मान मिळविला आहे. अर्णव अमोल पाटील हा विद्यार्थी ९७.८० टक्के गुणांसह विद्यालयातून द्वितीय तर कु. मधुरा धनाजी मुळीक हिने ९७.०० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला आहे.
विद्यालयातील गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे —
१) कु. प्रांजली सचिन हगवणे – ९८.८०%
२) अर्णव अमोल पाटील – ९७.८०%
३) कु. मधुरा धनाजी मुळीक – ९७.००%
४) कु. फिजा अरिफ बागवान – ९३.६०%
५) कु. समीक्षा अशोक भिसे – ९१.६०%
६) कु. रोहिणी पांडुरंग मुळीक – ८९.६०%
७) रोहित प्रदीप गवारे – ८९.६०%
८) कु. सानिया असलम नदाफ – ८९.२०%
९) कु. श्रद्धा सचिन नरुटे – ८६.८०%
१०) कु. प्रगती नरहरी गटकूळ – ८४.२०%
११) आयुष शिवकांत कोकाटे – ८३.८०%
१२) तजीम फारूख मोमीन – ८२.६०%
या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार सुजितसिंह ठाकुर, संस्थेच्या सचिवा सौ. प्रज्ञाताई कुलकर्णी, समूहाचे मार्गदर्शक विकास कुलकर्णी, कल्याणसागर माध्यमिक विद्यालय डोमगावचे मुख्याध्यापक सुबोधसिंह ठाकुर, परंडा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष समरजितसिंह ठाकूर, सरस्वती प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत पवार, विद्यालयाचे मुख्याध्यापक किरण गरड तसेच शिक्षक मुकुंद भोसले, चंद्रकांत तनपुरे, महादेव नरुटे, अजित गव्हाणे, रोहित रासकर, दादासाहेब सुरवसे आदींनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!