नगर परिषद कर्मचारी सोंडगे यांच्या निषेधार्थ परंडा शहर कडकडीत बंद.
नगर परिषद कर्मचारी सोंडगे यांच्यवरा निलंबनाची कारवाई करण्याची निवेदनाद्वारे मागणी.
![]() |
| Paranda city observes a complete shutdown in protest against Municipal Council employee Sondge. |
रंगोली न्युज - परंडा दि. ९) Paranda city observes a complete shutdown in protest against Municipal Council employee Sondge. परंडा नगर परिषद कार्यालयातील कार्यालयीन अधीक्षक जगदीश सोंडगे यांनी जातीवाचक अपशब्द वापरून मुस्लिम समाजाच्या भावना दुखाविल्याच्या निषेधार्थ दि. ९ मे रोजी परंडा शहर बंद कडकडीत बंद ठेवण्यात आले.
परंडा शहर बंदला शहरातील व्यापारी, मुस्लिम समाज आणि नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. शहरातील मुख्य बाजार पेठ मंडई पेठ, टिपू सुलतान चौक, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महाराणा प्रताप चौक, महात्मा फुले चौक यासह संपुर्ण परंडा शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले होते.
तहसीलदार यांना निवेदन देत समस्त मुस्लिम समाज व नागरिकांच्या वतीने संबंधित कर्मचारी जगदीश सोंडगे यांना तात्काळ निलंबित करून कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. व कारवाई न झाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
![]() |
| Paranda city observes a complete shutdown in protest against Municipal Council employee Sondge. |
तहसिलदा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दि. २६ एप्रिल रोजी परंडा शहरातील नागरिक व पत्रकार मुजावर यांनी शहरात दोन-तीन दिवसांपासून कचरा घंटागाडी आली नसल्याबाबत मोबाईलवरून विचारणा केली असता, नगर परिषद कर्मचारी जगदीश सोंडगे यांनी अश्लील भाषेत बोलून जातीवाचक शिवीगाळ केली होती. या घटनेमुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. परंडा हे सर्वधर्मीय नागरिक गुण्यागोविंदाने नांदणारे शांतताप्रिय शहर असून, अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. नागरिकांच्या समस्या सोडवण्याऐवजी जाती-धर्मावरून अपमानास्पद भाषा वापरणे ही गंभीर बाब असल्याचे मुस्लिम समाजाच्या वतीने सांगण्यात आले.
या घटनेच्या निषेधार्थ दि. ९ मे रोजी परंडा शहर बंद ठेवण्यात आले होते. संबंधित कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात यावे, अन्यथा यापुढे अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मुस्लिम समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!


0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!