बावची विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान; तहसीलदार निलेश काकडे यांची उपस्थिती.
गुणवत्तेचा गौरव सोहळा; ९० टक्क्यांवरील ४२ विद्यार्थ्यांचा सत्कार.
![]() |
| Meritorious Students Honored at Bavchi School; Tehsildar Nilesh Kakade in Attendance. |
रंगोली न्युज - परंडा दि. ९: Meritorious Students Honored at Bavchi School; Tehsildar Nilesh Kakade in Attendance. बावची विद्यालय, परंडा व वसंतराव शंकरराव काळे कनिष्ठ महाविद्यालय, परंडा येथे एस.एस.सी. बोर्ड परीक्षा मार्च २०२६ तसेच इयत्ता बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा दि. ९ रोजी सन्मान सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
एस.एस.सी. बोर्ड परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर बावची विद्यालयाने यंदाही उल्लेखनीय यश संपादन केले. विद्यालयातील २२९ पैकी २२४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यामध्ये १२१ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य, ७० विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी तर ३१ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी प्राप्त केली आहे. तसेच ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या ४२ गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी कु. गायत्री गणेश कोरे हिने ९९.६० टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. तसेच वसंतराव शंकरराव काळे कनिष्ठ महाविद्यालयातील कला शाखेतील प्रथम तीन व विज्ञान शाखेतील प्रथम तीन गुणवंत विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून परंडा तालुक्याचे तहसीलदार निलेश काकडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बिभिषण रोडगे सर होते. यावेळी प्राचार्य नारायण खैरे, प्रा. दिपक हुके, गणेश कोरे, विकास ठवरे, अजिमोद्दीन सय्यद, प्रमोद वेदपाठक आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात कु. स्नेहल बाळू सुळ, श्रेया संजय पाटील, शिवानी बंकेश लिमकर, गायत्री गणेश कोरे तसेच पालक प्रतिनिधी म्हणून दिपक हुके व अनिल नरके यांनी मनोगत व्यक्त केले.
विद्यालयाचे प्राचार्य नारायण खैरे यांनी विद्यालयातील विविध उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. तर तहसीलदार निलेश काकडे यांनी विद्यालयातील शिस्त, गुणवत्ता व सातत्यपूर्ण यशाचे कौतुक केले.
यावेळी गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळविणाऱ्या चार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे गणित विषयाचे शिक्षक सचिन मोरे यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विकास वाघमारे यांनी केले.
सत्कार करण्यात आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये गायत्री गणेश कोरे (९९.६०), नियती विठ्ठल कानगुडे (९७.४०), पृथ्वीराज रमेश वाघमोडे (९७.४०), यशराज विजय पाटील (९७.२०), भूमिका बाळासाहेब खवले (९६.६०), विराज रवींद्र बनसोडे (९६.४०), शिवानी बंकेश लिमकर (९६.२०), सोनम नितीन शिंदे (९६.२०), मृण्मयी विकास ठवरे (९६.२०), अनुष्का जयवंत पाटील (९६.००), तनिष्का महेंद्र चौधरी (९६.००) यांच्यासह इतर गुणवंत विद्यार्थ्यांचा समावेश होता.
कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला शाखेत सुळ स्नेहल बाळू (७८.६७), भोजने वैष्णवी नागेश (६१.३३), करंजुले युवराज दिपक (६०.००) तर विज्ञान शाखेत साक्षी सुनिल वाडेकर (६८.००), सुरवसे कल्याणी मधुकर (६७.००) व गोरे रेणुका जालिंदर (६५.८३) या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!