परंडा तालुक्यात बावची विद्यालयाचा दबदबा कायम; गायत्री कोरे तालुक्यात प्रथम.
गुणवत्तेची परंपरा अबाधित; बावची विद्यालयाने पुन्हा पटकावले तालुक्यात प्रथम स्थान.
![]() |
| Tradition of Excellence Intact: Bawchi School Once Again Secures First Place in the Taluka. |
रंगोली न्युज - परंडा दि. ९ : Tradition of Excellence Intact: Bawchi School Once Again Secures First Place in the Taluka. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या एस.एस.सी. बोर्ड परीक्षा मार्च २०२६ चा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला असून परंडा तालुक्यातील बावची विद्यालयाने पुन्हा एकदा दैदिप्यमान यश संपादन करत तालुक्यात प्रथम येण्याची डबल हॅट्रिक पूर्ण केली आहे. सलग सहा वर्षे तालुक्यात अव्वल स्थान मिळवत विद्यालयाने गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे.
विद्यालयातील विद्यार्थिनी कु. गायत्री गणेश कोरे हिने ९९.६० टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
विद्यालयाचा एकूण निकाल ९७.८१ टक्के लागला असून २२९ विद्यार्थ्यांपैकी २२४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये १२१ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य, ७० विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी तर ३१ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी प्राप्त केली आहे.
विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये नियती विठ्ठल कानगुडे व पृथ्वीराज रमेश वाघमोडे यांनी प्रत्येकी ९७.४० टक्के, यशराज विजय पाटील ९७.२० टक्के, भूमिका बाळासाहेब खवले ९६.६० टक्के, विराज रवींद्र बनसोडे ९६.४० टक्के, शिवानी बंकेश लिमकर, सोनम नितीन शिंदे व मृण्मयी विकास ठवरे यांनी प्रत्येकी ९६.२० टक्के, अनुष्का जयवंत पाटील व तनिष्का महेंद्र चौधरी यांनी प्रत्येकी ९६ टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.
तसेच अंकिता सर्जेराव करळे ९५.८०, मेघराज युवराज काकडे ९५.६०, यशराज रामा कांबळे ९५.४०, पृथ्वीराज संतोष रोकडे ९५.२०, यशराज दिपक हुके ९४.८०, मयूर ईश्वर जगदाळे व समृद्धी सुदाम पाटील ९४.४०, जान्हवी जगदीश पाटील व पार्थ रविंद्र थोरात ९४.२०, आदित्य अनिल नरके व आदित्य परेश कोयले ९४.०० टक्के गुण मिळवत यश संपादन केले.
याशिवाय तनिष्का अमोल केमदारणे, प्रणव रामराजा कोकाटे, तनिष्का छत्रपती काकडे, सान्वी सुयोग ढाळे, श्रेया संजय पाटील, सिद्धी संतोष बुलबुले, समर्थ रामचंद्र ननवरे, प्रतीक्षा बाबासाहेब राऊत, शंभूराजे हनुमंत वळेकर, सागर महावीर गवारे, ज्ञानेश्वर युवराज खैरे, ज्ञानेश्वरी सुग्रीव चौधरी, भावेश सुरेश मदने, अलमास अजिमोद्दीन सय्यद, ज्ञानेश्वरी सचिन महाडिक, समीक्षा जयवंत बोऱाडे, जान्हवी अनिल मेहेर, नंदिनी महादेव इनामे, रेहान इरफान बागवान व समर्थ नवनाथ तनपुरे यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत विद्यालयाच्या यशात भर घातली.
या अभिमानास्पद यशाबद्दल शाळेचे संस्थापक मा. श्री. बिभिषण रोडगे सर तसेच मुख्याध्यापक मा. श्री. नारायण खैरे सर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, पालकांचे व शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालकांचे सहकार्य यामुळे विद्यालयाने यशाची ही परंपरा अधिक भक्कम केल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!