ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

गुणवत्तापूर्ण शिक्षणाची पुन्हा प्रचिती; ग्लोबल विद्यालयाचा शंभर टक्के निकाल ग्लोबल विद्यालयाचा दहावीचा निकाल १००%; शिवानी जगताप विद्यालयात प्रथम. Global School's Class 10 Results: 100%; Shivani Jagtap Tops the School.

गुणवत्तापूर्ण शिक्षणाची पुन्हा प्रचिती; ग्लोबल विद्यालयाचा शंभर टक्के निकाल

ग्लोबल विद्यालयाचा दहावीचा निकाल १००%; शिवानी जगताप विद्यालयात प्रथम.

Global School's Class 10 Results: 100%; Shivani Jagtap Tops the School.
Global School's Class 10 Results: 100%; Shivani Jagtap Tops the School.

रंगोली न्युज - परंडा दि. ९) Global School's Class 10 Results: 100%; Shivani Jagtap Tops the School. परंडा येथील ग्लोबल विद्यालयाने गतवर्षीप्रमाणे यंदाही दहावी बोर्ड परीक्षेत १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखत उज्वल यश संपादन केले आहे. विद्यालयातील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय गुण मिळवत विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटविला आहे.

        या परीक्षेत शिवानी जगताप हिने ९५.८० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. सार्थक तौर याने ९५.६० टक्के गुणांसह द्वितीय, तर साहिल साळुंके याने ९२.४० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.

     तसेच शिवानी उमाप ८९.४० टक्के, सिद्धी लांडगे ८६.४० टक्के, सानिका नाईकनवरे ८४.६० टक्के, गौरी सूर्यवंशी ८४.२० टक्के, समर्थ गटकुळ ८२.४० टक्के, राजकन्या भालेकर ८१.६० टक्के, हर्षदा गटकुळ ८०.६० टक्के, प्रियंका सोनवर ७९.२० टक्के, सार्थक जहागीरदार ७९.२० टक्के, शिवकन्या भालेकर ७७.८० टक्के, प्रिती मचिंदर ७५.२० टक्के, अशोक कोलते ७४.८० टक्के, आदित्य गटकूळ ७४.०० टक्के, भाग्यलक्ष्मी पाटील ७२.६० टक्के, स्नेहल शिरगिरे ७१.०० टक्के, अनुष्का भोंग ६९.२० टक्के, संग्राम गरदाडे ६९.०० टक्के, प्रेम गटकुळ ६८.८० टक्के, गौरी पिंगळे ६८.४० टक्के, पायल माने ६६.४० टक्के, आर्यन कोलते ६६.४० टक्के, पंकज कुदळे ६०.६० टक्के व प्रतीक्षा मोटे हिने ५८.०० टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.

          विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गोरख मोरजकर व सचिव आशाताई मोरजकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या मेहनतीसोबत शिक्षकांचे मार्गदर्शन व पालकांचे सहकार्य यामुळे हे यश शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

          विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना आशाताई मोरजकर म्हणाल्या की, “ग्लोबल ही विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविणारी संस्था आहे. शाळेमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांनी कोणतीही खाजगी शिकवणी लावलेली नव्हती. शाळेतील शिक्षकांचे परिश्रम आणि विद्यार्थ्यांची मेहनत हेच यशाचे खरे गमक आहे. ग्लोबलमधील विद्यार्थ्यांना कष्ट करण्याची सवय लावली जाते. त्यामुळे विद्यार्थी स्वतः अभ्यास करून यश मिळवतात आणि पुढील शिक्षणातही कोणत्याही अडचणींना न डगमगता यशस्वी होत राहतात.”



आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी 

👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

Post a Comment

0 Comments