गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा कायम; संत मीरा पब्लिक स्कूलचा शंभर टक्के निकाल.
इयत्ता दहावीमध्ये संत मीरा पब्लिक स्कूलचे उज्वल यश; २० विद्यार्थी ९० टक्क्यांच्या पुढे
![]() |
| The Tradition of Quality Education Continues; Sant Mira Public School Achieves 100% Results. |
रंगोली न्युज - परंडा दि. ९ : The Tradition of Quality Education Continues; Sant Mira Public School Achieves 100% Results. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, लातूर यांच्या वतीने जाहीर झालेल्या इयत्ता दहावीच्या निकालात परंडा येथील संत मीरा पब्लिक स्कूलने सलग १३ वर्षे १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण निकाल मिळवत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे.
यंदाच्या निकालात आवेज अजीम मुजावर याने ९७.४० टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. अपूर्वा गणेश लिमकर व सुहानी सुदाम ओहळ यांनी प्रत्येकी ९६.८० टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक प्राप्त केला, तर वैष्णवी दौलत शिंदे हिने ९६.६० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला.
तसेच श्याम राजेंद्र जाधव ९६ टक्के, शिवप्रताप तुकाराम नरके ९५.२० टक्के, आशना शफिक शेख ९५ टक्के, स्वराली अंगद कोकाटे ९४.२० टक्के, प्रथमेश शहाजी जाधव ९४ टक्के, वीरेंद्र रवींद्र वाघमोडे ९४ टक्के, सिद्धांत दत्तात्रय सरडे ९२.४० टक्के, अक्षय कोंडीबा नरुटे ९२.२० टक्के, सिद्धांत दुर्गापा पवार ९२ टक्के, समृद्धी सतीश शिंदे ९१.८० टक्के, अफान आयुब चौधरी ९१ टक्के, सिद्धी रामलिंग भिसे ९०.८० टक्के, ऋतुजा कानिफनाथ गोडगे ९०.४० टक्के, सारा अमित राऊत ९० टक्के, श्रीराज अंबादास शिंदे ९० टक्के व किशोर सुभाष कासारे ९० टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.
एकूण ६६ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यापैकी २० विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले. तसेच ५४ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले असून ८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर ४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांनी आपल्या यशातून पालक, शिक्षक व संस्थेचे नाव उज्ज्वल केले आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, नियमित सराव परीक्षा, विशेष मार्गदर्शन वर्ग, पालक बैठका, अभ्यासाचे योग्य नियोजन व विद्यार्थ्यांवर ठेवलेले वैयक्तिक लक्ष हे महत्त्वाचे घटक ठरल्याचे मुख्याध्यापक संतोष भांडवलकर यांनी सांगितले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थापक डॉ. प्रतापसिंह पाटील, आमदार तथा उपाध्यक्ष डॉ. राहुल पाटील, सचिव डॉ. उदयसिंह पाटील, संचालिका डॉ. शिल्पा पाटील, मार्गदर्शक करण पाटील तसेच शिक्षक, पालक व परिसरातील नागरिकांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यालयाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल परिसरातून कौतुक व्यक्त करण्यात येत आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!