प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पाडुळे बंधुंचे PSI पदाला गवसणी.
शेतकरी कुटुंबातील पाडुळे बंधुंचे मोठे यश; भाजपा कार्यालयात सत्कार
![]() |
| Overcoming adversity, the Padule brothers secure the post of PSI. |
रंगोली न्युज - परंडा दि. ९)
Overcoming adversity, the Padule brothers secure the post of PSI.धाराशिव जिल्हा परंडा तालुक्यातील कौडगाव येथील शेतकरी कुटुंबातील दोन सख्खे भाऊ एकत्र पोलिस दलात पोलीस शिपाई म्हणून भरती झाले. अतिशय कठीण आणि प्रतिकूल परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण केले. या पाडुळे बंधुंनी ऊस तोड व वाहतूकीचे काम करत अपार कष्ट, जिद्द आणि चिकाटीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अंतर्गत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी महारुद्र दत्तात्रय पाडुळे आणि रत्नाकर महारुद्र पाडुळे या सख्ख्या भावांनी एकाच वेळी परिक्षा उत्तीर्ण होऊन दोघांनी मोठे यश संपादन केले. तसेच कृष्णा भरत ठवरे याचीही रत्नागिरी येथे पोलीस शिपाई म्हणून निवड झाली या यशाबद्दल भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांनी भाजपा संपर्क कार्यालय, परंडा येथे या दोन्ही पाडुळे बंधुंचा व ठवरे यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.
![]() |
| Overcoming adversity, the Padule brothers secure the post of PSI. |
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अरविंदबप्पा रगडे, परंडा न.प. उपनगराध्यक्ष समरजीतसिंह ठाकूर, कौडगावचे सरपंच तथा भाजपा ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष तुकाराम हजारे, भाजपा नेते जयदेव बप्पा गोफणे, श्रीमंत शेळके, ह.भ.प. बालाजी महाराज बोराडे, साहेबराव पाडुळे, श्रीकृष्ण शिंदे, पांडुरंग मुसळे, आप्पासाहेब मदने, संतोष भिसे, सागर ठवरे, प्रदीप पाडुळे, शिवाजी देवकर, अनिकेत कुलकर्णी, अमोल तरटे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.


0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!