ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

धाराशिव जिल्ह्याचा इयत्ता १० वी चा ९१.२९ तर परंडा तालुक्याचा ९२.६० टक्के निकाल. परंडा तालुक्यातील ४० पैकी ९ शाळांचा १०० टक्के निकाल. Dharashiv district recorded a Class 10 result of 91.29%, while Paranda taluka recorded 92.60%.

धाराशिव जिल्ह्याचा इयत्ता १० वी चा ९१.२९ तर परंडा तालुक्याचा ९२.६० टक्के निकाल.

परंडा तालुक्यातील ४० पैकी ९ शाळांचा १०० टक्के निकाल.

Dharashiv district recorded a Class 10 result of 91.29%, while Paranda taluka recorded 92.60%.
(AI Image) Dharashiv district recorded a Class 10 result of 91.29%, while Paranda taluka recorded 92.60%.

रंगोली न्युज - परंडा दि. ८) 

Dharashiv district recorded a Class 10 result of 91.29%, while Paranda taluka recorded 92.60%. माध्यमीक शालांत परिक्षेसाठी धाराशिव जिल्ह्यातुन एकून २१ हजार ६९३ मुले परिक्षेस पात्र ठरली होती त्यापैकी १९ हजार ८०४ मुले उत्तीर्ण झाली आहेत. त्याचा दि. ८ मे रोजी निकाल जाहीर झाला असून धाराशिव जिल्ह्याचा इयत्ता १० वी चा ९१.२९ तर परंडा तालुक्याचा ९२.६० टक्के निकाल लागला आहे. 

      धाराशिव जिल्हा परंडा तालुक्यातील माध्यमिक शालांत "Secondary School Certificate" दहावी परिक्षेसाठी ४० विद्यालयातील १७८५ विद्यार्थी पैकी १६५३ विद्यार्थी उत्तिर्ण झाले असुन ९२.६० टक्के निकाल लागला आहे. त्यामध्ये ९ विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला असून यावर्षीही मुलीनीच बाजी मारली आहे.

      तालुक्यासह शहरातील ९ शाळांचा १०० टक्के निकाल लागला त्यामध्ये संत मिरा पब्लिक स्कुल परंडा, डोंजे विद्यालय डोंजे, राजश्री शिव छत्रपती विद्यालय वाकडी, भैरवनाथ विद्यालय कंडारी, कल्याणी माध्यमिक विद्यालय कुक्कडगांव, ग्लोबल विद्यालय खानापुर परंडा. विजयसिंह विद्यालय चिंचपूर (बु.), बजरंग विद्यालय आरणगाव, खंडेश्वर विद्यालय परंडा या शाळांचा समावेश आहे.

     महात्मा गांधी विद्यालय परंडा-८२.९८ टक्के, प्रेरणा हायस्कुल परंडा- ६८.६२ टक्के, कल्याणराव भातलंवडे विद्यालय कपिलापुरी- ८८.८८, जिल्हा परिषद हायस्कुल जवळा (नि.)- ९०.००, चांदणी विद्यालय आसु- ८१.२५, न्यु हायस्कुल अनाळा-९२.१०, विजयसिंह विद्यालय चिंचपुर (बु)- १००, प्रतिभा पवार हायस्कुल जवळा (नि) ७५.००, निळकंठेश्वर विद्यालय चिंचपुर (खु)-९०.००, सिध्देश्वर विद्यालय देवगाव (खु)-८०.००, डॉ. शामाप्रसाद मुखर्जी माध्यमिक विद्यालय कुंभेफळ-९४.२८, कल्याणसागर माध्यमिक विद्यालय डोमगाव- ९७.२९, बावची विद्यालय परंडा- ९७.८१, बजरंग विद्यालय आरणगाव- १००,  संभाजीराजे विद्यालय दहिटणा- (बोडका) -९७.४३, कै.रावसाहेब पाटील माध्यमिक  विद्यालय परंडा-७४.०७, जिल्हा परिषद हायस्कुल परंडा-५७.१४, सिध्दार्थ विद्यालय अंदोरा-८५.७१, कल्याणसागर माध्यमिक विद्यालय परंडा-९८.३८ टक्के. जिल्हा परिषद मुलींची शाळा परंडा-९०.९०, जिल्हा परिषद हायस्कुल सिरसाव-९६.२९, जिल्हा परिषद हायस्कुल सोनारी-९६.४२, श्रीसंत ज्ञानेश्वर प्रशाला लोणी-९४.२८, जय हनुमान विद्यालय वाटेफळ-९८.२७, श्रीसंत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय तांदुळवाडी- ९७.६१, माणिक बाबा विद्यालय शेळगाव- ९६.६३, श्रीमती पवित्राताई दैठणकर हायस्कुल रत्नापूर-९०.००, रामेश्वर विद्यालय शिराळा-९७.०५, श्रीराम हायस्कुल पाचपिंपळा-९७.१४, जिल्हा परिषद उर्दू हायस्कुल परंडा-९१.१७, नवीन माध्यमिक विद्यालय रोहकल-८४.३७, श्रीसंत ज्ञानेश्वर माऊली विद्यालय टाकळी- ८८.८८, नवीन माध्यमिक विद्यालय इनगोंदा- ६६.६६ टक्के.

[ ]तालुक्यातील ४० विद्यालयातील १८३५ विद्यार्थ्यांनी परिक्षेची नोंदणी केली होती. त्यापैकी १७८५ विद्यार्थी परिक्षेसाठी पात्र ठरले.  यामधुन १६५३ विद्यार्थी उत्तिर्ण झाले. यातील ५२७ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले, प्रथम ग्रेड ५७५, द्वितीय ग्रेड ४२०, पास ग्रेड १३१ मुले आहेत.

[ ] १० वी च्या परिक्षेमध्ये धाराशिव जिल्ह्याचा ९१.२९ टक्के परंडा तालुक्याचा ९२.६० टक्के निकाल.

     धराशिव जिल्ह्यात इयत्ता १० वी च्या परिक्षेसाठी ११ हजार ८५० मुले व ९ हजार ८४३ मुली परिक्षेस बसल्या होत्या. यामध्ये १० हजार ४६४ मुले तर ९३४० मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर परंडा तालुक्यामध्ये एकूण मुले ९८२ परिक्षेला पात्र ठरली पैकी ८७७ उतिर्ण झाले तर मुली ८०३ पैकी ७७६ मुली उतिर्ण झाले असुन यावर्षी सरासरीच्या तुलनेत धाराशिव जिल्ह्यासह परंडा तालुक्यात मुलीनीच बाजी मारली.



आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी 

👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!


Post a Comment

0 Comments