परंडा किल्ला परिसरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम; १४ मे रोजी नगरपरिषदेची कारवाई.
![]() |
| (AI Image) Drive to Remove Encroachments in the Paranda Fort Vicinity; Municipal Council Takes Action on May 14. |
रंगोली न्युज - परंडा दि. ८)
Drive to Remove Encroachments in the Paranda Fort Vicinity; Municipal Council Takes Action on May 14. धाराशिव जिल्हा परंडा शहरातील नागरिकांना नगरपरिषद परंडा यांच्या वतीने महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. परंडा किल्ल्याकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर तसेच किल्ला परिसरातील सार्वजनिक रस्ते व मोकळ्या जागांवर करण्यात आलेले अतिक्रमण हटविण्याची मोहीम "Encroachment removal campaign" हाती घेण्यात आली आहे.
नगरपरिषदेकडून दि. १४ मे २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. संबंधित अतिक्रमण धारकांनी आपले अतिक्रमण स्वखर्चाने व स्वतःहून काढून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. अन्यथा नियोजित दिवशी नगरपरिषदेकडून अतिक्रमण हटविण्यात येईल व संबंधितांचा मुद्देमाल जप्त करण्यात येणार आहे. तसेच अतिक्रमण काढण्यासाठी लागणारा खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येईल, असा इशाराही नगरपरिषद प्रशासनाने दिला आहे.
परंडा किल्ला परिसरातील रस्ते मोकळे व सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!