माजी सैनिकावर खोटा गुन्हा दाखल भोवला; कोर्टाचा पाच लाख नुकसानभरपाईचा आदेश.
खोट्या फौजदारी खटल्याची मोठी किंमत; प्रतिवादीस पाच लाख भरण्याचे आदेश.
![]() |
| (AI Image) Heavy Price for Frivolous Criminal Case; Defendant Ordered to Pay Five Lakhs. |
रंगोली न्युज - परंडा दि. ८)
Heavy Price for Frivolous Criminal Case; Defendant Ordered to Pay Five Lakhs. धाराशिव जिल्हा परंडा तालुक्यातील मौजे हिंगणगाव (खु.) येथील माजी सैनिक मधुकर नवनाथ बिडवे यांच्यावर सुडबुद्धीने खोटा फौजदारी खटला दाखल केल्याप्रकरणी न्यायालयाने संबंधित प्रतिवादीस पाच लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, माजी सैनिक मधुकर नवनाथ बिडवे हे सन २०१० ते २०१५ या कालावधीत हिंगणगाव (खु.) गावचे सरपंच म्हणून कार्यरत होते. दरम्यान, गावातील भागवत अनंता बिडवे यांनी मधुकर बिडवे, त्यांचे वडील नवनाथ शिवदास बिडवे, वसुदेव दत्तु पवार तसेच तत्कालीन तलाठी एस. एस. ठाकरे यांच्या विरोधात परंडा न्यायालयात फौजदारी खटला क्रमांक २३/२०१४ दाखल केला होता.
सदर खटला हा सुडबुद्धीने व माजी सैनिक तसेच त्यांच्या कुटुंबाला मानसिक त्रास देण्याच्या उद्देशाने दाखल करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी तब्बल १० वर्षे ३ महिने सुनावणी चालल्यानंतर पुरेशा व सबळ पुराव्याअभावी परंडा न्यायालयाने दि. १० मे २०२२ रोजी सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले होते.
यानंतर मधुकर नवनाथ बिडवे यांनी भागवत अनंता बिडवे यांच्या विरोधात नुकसानभरपाईसाठी दावा क्रमांक ०७/२०२४ दाखल करत २५ लाख रुपयांची मागणी केली होती. या प्रकरणात वादी पक्षाचे वकील ॲड. संतोष सूर्यवंशी यांनी बाजू मांडली. सुनावणीअंती त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर परंडा येथील आर. टी. इंगळे यांनी दि. ०६ मे २०२६ रोजी निकाल देत वादी मधुकर नवनाथ बिडवे यांचा दावा मंजूर केला. न्यायालयाने प्रतिवादी भागवत अनंता बिडवे यांना सुडबुद्धीने केलेल्या अभियोजनाबद्दल नुकसानभरपाई म्हणून पाच लाख रुपये एका महिन्याच्या आत मधुकर बिडवे यांना अदा करण्याचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणात वादीतर्फे ॲड. संतोष सूर्यवंशी यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. अनिकेत जगताप, ॲड. सनी राशिनकर व ॲड. निरंजन कोकणे यांनी सहकार्य केले.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!