ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

"माझं गाव आरोग्य संपन्न गाव" अभियानाचा शुभारंभ. परंडा पंचायत समिती सभागृह येेथे तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न. "निरोगी माता, निरोगी कुटूंब" सभापती - अर्चनाताई अण्णासाहेब जाधव. Launch of the "My Village, a Healthy Village" Campaign.

"माझं गाव आरोग्य संपन्न गाव" अभियानाचा शुभारंभ.

परंडा पंचायत समिती सभागृह येेथे तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न.

"निरोगी माता, निरोगी कुटूंब" सभापती - अर्चनाताई अण्णासाहेब जाधव.

Launch of the "My Village, a Healthy Village" Campaign.
Launch of the "My Village, a Healthy Village" Campaign.

रंगोली न्युज - परंडा दि. ६) 

Launch of the "My Village, a Healthy Village" Campaign. धाराशिव जिल्हा परंडा तालुक्यातील "माझं गाव आरोग्य संपन्न गाव" सार्वजनिक आरोग्य विभाग मार्फत राबविण्यात येणऱ्या अभियानाचा शुभारंभ दि. ५ मे रोजी पंचायत समिती सभागृह येथे करण्यात आला.

      या कार्यशाळा कार्यक्रम शुभारंभ प्रसंगी पंचायत समिती सभापती अर्चनाताई अण्णासाहेब जाधव, उपसभापती परसू गवारे, परंडा तालुका शिवसेना प्रमुख अण्णासाहेब जाधव, परंडा पंचायत समिती गटनेते अमोल नलवडे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. निंभोरकर यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करून अभियानाची सुरवात करण्यात आली.

     गाव खेड्यांना स्वच्छ, स्वावलंबी व निरोगी बनविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या संकल्पनेतुन "माझ गाव, आरोग्य संपन्न गाव" अभियानाचा दि. १ एप्रील २०२६ पासून अंमलबजावनीचा शासनाने निर्णय घेतला आहे. या अभियानामुळे ग्रामीन नागरीकांसाठी सुलभ, प्रतिबंधात्मक गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देऊन त्यांना निरोगी सक्षम सशक्त व जागरूक ग्रामीण समुदाय घडविण्यासाठी हा या अभियानाचा उद्देश आहे. आरोग्याच्या दृष्टीकोणातून ग्रामीण गावांचा सर्वांगीन विकास सुधारणेसाठी मूलभूत आरोग्य सेवा, पोषण, स्वच्छता, शुध्द पाणी, जनजागृती, संगणकीकृत आरोग्य माहीती संकलन, प्रशिक्षण व प्रशासन समन्वयाचा समावेश करून "माझ गाव, आरोग्य संपन्न गाव" अभियान अंतर्गत आरोग्य हे ग्रामविकासाच्या केंद्रस्थानी असणार आहे.

[ ] सक्षम समाजाचा पाया म्हणजे "निरोगी माता, निरोगी कुटूंब" घरामध्ये माता निरोगी असेल तरच ती स्वतःसह मुलांची व कुटूंबाची काळजी उत्तम प्रकारे घेऊ शकते. या अभियानांतर्गत ग्रामीण परिसरातील सर्व नागरीक व विशेष महीलांचे आरोग्याची काळजी घेण्यावर भर देणे गरजेचे आहे. त्यामुळे "माझ गांव आरोग्य संपन्न गांव" या अभियानामध्ये सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन पं.स. सभापती अर्चना अण्णासाहेब जाधव यांनी केले.



आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी 

👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!


Post a Comment

0 Comments