जवळ नि. येथे जलतारा कामाचा तहसिलदार निलेश काकडे यांच्या हस्ते शुभारंभ.
मनरेगा अंतर्गत जलतरा योजना ही शेतकऱ्यांच्या फायद्याची योजना.
![]() |
| The 'Jaltara' project was inaugurated here by Tehsildar Nilesh Kakade. |
रंगोली न्युज - परंडा दि. ५)
The 'Jaltara' project was inaugurated here by Tehsildar Nilesh Kakade. धाराशिव जिल्हा परंडा तालुक्यातील जवळा नि. येथे दि. ५ मे रोजी जलतरा कामाचा शुभारंभ "Inauguration of the Jaltara Project" नाम फाउंडेशन व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने परंडा तहसीलदार निलेश काकडे, प्रभारी तालुका कृषी अधिकारी मनोज पाटील, मंडळ कृषी अधिकारी शामराव फरतडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी येथे उपस्थित सहाय्यक कृषी अधिकारी संदीप यादव, कल्याण जाधव, महसूल अधिकारी खोसे तसेच जवळा नि. येथील शेतकरी अमोल कुंडलिक कातुरे, शाहू कुंडलिक कातूरे, आश्रू कातूरे आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या जलतारा योजना ही मनरेगा अंतर्गत सुरू आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी शेतामध्ये ५X५ फूटाचे शोषखड्डे घेतले जातात. त्यामुळे भुजल पातळी वाढण्यास मदत होते. ही योजना शेतकऱ्यांच्या फायद्याची असून भूजल पुनर्भरण शेती उत्पादन व पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी महत्वाची ठरते. या योजनेमधुन शेतकऱ्यांना मजुरी म्हणुन ४ हजार ८०० रूपये पर्यंत अणुदान दिले जाते.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!