पोलीस उपनिरीक्षकपदी सादिक शेख यांना पदोन्नती; परंड्यात सत्कार
![]() |
| Sadiq Shaikh promoted to Police Sub-Inspector; felicitated in Paranda. |
सादिक शेख यांनी आपल्या पोलीस सेवेत विविध ठिकाणी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावले आहे. ते जिल्हा कवायत निर्देशक, पोलीस प्रशिक्षण केंद्र सोलापूर येथे ड्रिल इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत होते. तसेच सोलापूर ग्रामीण पोलीस दलात करमाळा पोलीस ठाणे आणि मोडनिंब येथे महामार्ग पोलीस म्हणून त्यांनी सेवा बजावली. २०१५ पर्यंत त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळत प्रामाणिकपणे सेवा केली.
१४ ऑगस्ट २०२६ रोजी त्यांना श्रेणी पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती मिळाली असून, त्यांच्या पोलीस सेवेला ३२ वर्षे पूर्ण झाली आहेत. सध्या ते सोलापूर येथे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
सत्काराला उत्तर देताना सादिक शेख यांनी युवकांना प्रेरणादायी संदेश दिला. ते म्हणाले, “युवकांनी मोबाईलच्या व्यसनापासून दूर राहून शरीराला खेळाची सवय लावावी. कष्ट आणि व्यायाम केल्यास त्याचा नक्कीच फायदा होतो. मी देखील गरीब कुटुंबातून आलो आहे. मात्र खेळाची चिकाटी कधीही सोडली नाही. त्यामुळेच आज मी या पदापर्यंत पोहोचू शकलो.”
या प्रसंगी हाजी शेख अहमद बागवान, हाजी कादर मुजावर, हाजी खालील पठाण, सेवानिवृत्त मुख्याध्यापक अंकुशराव जाधव, व्हाईस ऑफ मीडिया तालुकाध्यक्ष मुजीब काझी, पत्रकार निसार मुजावर, नगरसेवक सत्तार पठाण, संजय घाडगे, समाजसेवक जमील शेख, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहराध्यक्ष श्रीहरी नाईकवाडी, बाळू गायकवाड, संतोष सातपुते, सुलेमान शेख, अन्वर शेख, शिवाजी बनसोडे, आयुब जीनेरी, नय्युम शेख, शहाजी नलवडे, तोहीद शेख, वैभव पवार, आवेश शेख, राहुल देवळे, दादा पठाण, गौस सय्यद, विठ्ठल माळी, अमीर जिनेरी, मैनुद्दीन शेख आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवानिवृत्त मुख्याध्यापक अंकुशराव जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाजसेवक जमील शेख यांनी परिश्रम घेतले.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.
👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!