श्री शिवाजी महाविद्यालय परंडा येथे. ‘जीवन कौशल्य शिक्षण’ विषयावर विशेष मार्गदर्शन कार्यक्रम.
![]() |
| A special guidance program on the subject of ‘Life Skills Education’ at Shri Shivaji Mahavidyalaya, Paranda. |
परंडा दि. २५ (रंगोली न्युज) – A special guidance program on the subject of ‘Life Skills Education’ at Shri Shivaji Mahavidyalaya, Paranda. श्री शिवाजी महाविद्यालय, परंडा, ग्लोबल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आणि उपजिल्हा रुग्णालय, परंडा यांच्या संयुक्त विद्यमाने किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी ‘जीवन कौशल्य शिक्षण’ या विषयावरील विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन सोमवार, दि. २५ ऑगस्ट रोजी महाविद्यालयात करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव आशाताई मोरजकर या उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हा रुग्णालय, परंडा येथील समुपदेशक डॉ. मकरंद वांबुरकर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अजय वैद्य तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी. एन. लोखंडे उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. मकरंद वांबुरकर यांनी आपल्या तीन वर्षांच्या कार्यकाळातील विविध अनुभव कथन केले. त्यांनी किशोरवयीन मुला-मुलींना एचआयव्ही/एड्स संदर्भातील शास्त्रीय माहिती देत सविस्तर जनजागृती केली. यासंदर्भात कोणतीही अडचण अथवा शंका असल्यास विद्यार्थ्यांनी उपजिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच समुपदेशन व तपासणीदरम्यान विद्यार्थ्यांची व रुग्णांची सर्व माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाते, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
याशिवाय विविध आरोग्यविषयक हेल्थ केअर टोल-फ्री क्रमांकांचे महत्त्व स्पष्ट करत रुग्णालय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना एचआयव्ही/एड्स संदर्भातील अधिकृत व आवश्यक माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी त्यांनी विशेष क्यूआर कोड (QR Code) उपलब्ध करून दिला. मोबाईलद्वारे हा क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर संबंधित माहिती विद्यार्थ्यांना थेट मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अध्यक्षीय समारोपात आशाताई मोरजकर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला देताना सांगितले की, “किशोरवय हा अनेक आव्हाने व समस्यांनी भरलेला टप्पा असतो. या वयात क्षणिक आकर्षणांना बळी न पडता विद्यार्थ्यांनी आपल्या करिअर घडविण्यावर आणि विविध जीवन कौशल्ये आत्मसात करण्यावर भर द्यावा.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रेखा पाडूळे यांनी केले, तर आभार प्रा. राजश्री तिपाले यांनी मानले.
या प्रसंगी श्री शिवाजी महाविद्यालय व ग्लोबल एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच इयत्ता ९ वी ते १२ वी आणि बी.सी.ए. व बी.एस्सी. (सीएस) विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.
👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!