ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

परंडा पोलीस स्टेशनच्या नवनियुक्त अधिकारी व पदोन्नतीप्राप्त कर्मचाऱ्यांचा सत्कार. Felicitation of newly appointed officers and promoted personnel of Paranda Police Station.

परंडा पोलीस स्टेशनच्या नवनियुक्त अधिकारी व पदोन्नतीप्राप्त कर्मचाऱ्यांचा सत्कार

Felicitation of newly appointed officers and promoted personnel of Paranda Police Station.
Felicitation of newly appointed officers and promoted personnel of Paranda Police Station.

परंडा दि. २६ (रंगोली न्युज) — Felicitation of newly appointed officers and promoted personnel of Paranda Police Station. परंडा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शंकर बराते यांनी पदभार स्वीकारल्याबद्दल तसेच पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती मिळाल्याबद्दल सादिक शेख तर साधू शेवाळे व राहूल खताळ यांची पोलीस हवालदारपदी पदोन्नतीप्राप्त कर्मचाऱ्यांचा आज शिवसेना शहर कार्यालय, खंडोबा चौक येथे युवा नेते विश्वजीत ज्ञानेश्वर पाटील यांच्या हस्ते सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी पदोन्नतीप्राप्त अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या. पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळालेली पदोन्नती ही त्यांच्या कार्यक्षमतेची व सेवाभावाची दखल असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.

सत्कार समारंभास शहर प्रमुख रईस भाई मुजावर, माजी नगरसेवक मन्नान बासले, विविध कार्यकारी सोसायटीचे पठाण, नगरसेवक सत्तार पठाण, मजहरभाई, सोमनाथ अलबत्ते, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक सचिन शिंदे, युवा शहरप्रमुख बच्चन डाके, युवा नेते साबीर भाई मुजावर, ज्येष्ठ नेते दत्तू धनवे, दत्ता मेहेर, माजी शहरप्रमुख सुनील वाघमारे, नाना वाघमारे, लतीफ कुरेशी, बाबा कुरेशी, हुसेन शेख, संतोष कदम, संतोष मेहर, औदुंबर पाटील, प्रशांत काळे साहेब यांच्यासह मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी नवनियुक्त अधिकारी व पदोन्नतीप्राप्त पोलीस कर्मचाऱ्यांना पुढील सेवेसाठी शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले.



Post a Comment

0 Comments