विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्या हस्ते प्राचार्य नारायण खैरे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान.
परंडा दि. १८ (रंगोली न्यूज) Principal Narayan Khaire was presented with the State-Level Meritorious Teacher Award by Legislative Council Chairman Ram Shinde. बावची विद्यालय, परंडा येथील प्राचार्य नारायण खैरे यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जन्मोत्सवानिमित्त आयोजित राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण समारंभात महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती मा. ना. प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
रविवार, दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी पुणे येथील सेनापती बापट मार्गावरील बालभारतीसमोरील सारथी सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात प्रसिद्ध लेखक व विचारवंत डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी प्रमुख भूमिका बजावली. कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षपदी उद्योजक मा. प्रमोदअप्पा देशमुख होते.
प्राचार्य नारायण खैरे यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी घेतलेले परिश्रम तसेच विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेऊन त्यांना या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्या या यशामुळे बावची विद्यालय, परंडा आणि परंडा तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी माजी शिक्षण उपनिरीक्षक रावसाहेब मिरगणे, संस्थेचे संस्थापक बिभीषण रोडगे, सचिन पाटील, सचिन मोरे, उमेश पाटील, रविंद्र शिंदे, शिवाजी खैरे, शुभम रोडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.
👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!