ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

परंडा येथे ‘आमची गुणी मुले प्रतिष्ठान’च्या वतीने शिष्यवृत्ती वितरण. Scholarship distribution at Paranda organized by ‘Amchi Guni Mule Pratishthan’

परंडा येथे ‘आमची गुणी मुले प्रतिष्ठान’च्या वतीने शिष्यवृत्ती वितरण.

Scholarship distribution at Paranda organized by ‘Amchi Guni Mule Pratishthan’
Scholarship distribution at Paranda organized by ‘Amchi Guni Mule Pratishthan’

परंडा दि. २५ (रंगोली न्यूज) — Scholarship distribution at Paranda organized by ‘Amchi Guni Mule Pratishthan’ लिंगायत हटकर कोष्टी समाज संचलित ‘आमची गुणी मुले प्रतिष्ठान’च्या वतीने परंडा शहरातील बी.फार्मसीची विद्यार्थिनी प्रतीक्षा महेश ऐतवाडे हिला कै. शांताई आण्णाराव उमराणे उच्चशिक्षण शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. शिष्यवृत्तीपोटी २५ हजार रुपये व प्रमाणपत्र देऊन तिचा गौरव करण्यात आला.

श्री बनशंकरी देवी मंदिर येथे रविवारी (दि. २३) आयोजित कार्यक्रमात प्रतिष्ठानचे सुनील घाटुळे, रामेश्वर नरखेडकर तसेच माजी नगरसेविका वनिता ऐतवाडे यांच्या हस्ते प्रतीक्षा ऐतवाडे हिला शिष्यवृत्तीची रक्कम व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

उच्च शिक्षण घेणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळावी आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने ‘आमची गुणी मुले प्रतिष्ठान’च्या माध्यमातून शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ मिळत असून, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचा आदर्श निर्माण होत आहे.

यावेळी डॉ. किरण विटकर, शिक्षण विस्तार अधिकारी महादेव विटकर, श्री. सुतार, प्रतिष्ठित व्यापारी हनुमंत विटकर, कल्याण ऐतवाडे, सोमनाथ ऐतवाडे, सागर विटकर, गुरुलिंग ऐतवाडे, महेश ऐतवाडे, सोमनाथ बोडके, अंकुश ऐतवाडे, अरुण ऐतवाडे, गणेश ऐतवाडे, संदीप विटकर, शुभम ऐतवाडे, मंथन विटकर यांच्यासह महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.

👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!


Post a Comment

0 Comments