ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

जिजामाता प्रथमिक विद्यामंदीर परंडा शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; बालवाडी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांनी रंगविला कार्यक्रम. Independence Day was celebrated with enthusiasm at Jijamata Primary Vidyamandir Paranda School.

जिजामाता प्रथमिक विद्यामंदीर परंडा शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; बालवाडी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांनी रंगविला कार्यक्रम

Independence Day was celebrated with enthusiasm at Jijamata Primary Vidyamandir Paranda School.
Independence Day was celebrated with enthusiasm at Jijamata Primary Vidyamandir Paranda School.

परंडा दि. १५ (रंगोली न्यूज) — Independence Day was celebrated with enthusiasm at Jijamata Primary Vidyamandir Paranda School. धाराशिव जिल्ह्यातील परंडा शहरातील जिजामाता प्राथमिक विद्यामंदिर येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा "August 15 Independence Day celebrated in an enthusiastic and patriotic atmosphere" करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालक आणि मान्यवरांनी स्वातंत्र्य दिनाचा उत्साह अनुभवला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे उपाध्यक्ष अमर साळुंके आणि शाळेचे मुख्याध्यापक सत्यजित घाडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात कृष्णा गवारे व कन्हैया गवारे यांनी सादर केलेल्या स्वागतगीताने झाली.

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

यावेळी शाळेतील विविध परीक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्कॉलरशिप, मंथन, अक्षरगंगा तसेच शाळेच्या जनरल नॉलेज परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.

यामध्ये ओंकार सुरवसे, सार्थक पाटील, सोनल गरड, स्वराली गवारे, अनुष्का काळे, सबा शहा बर्फीवाले, प्रांजली बनसोडे, अनुष्का भोसले, प्रेमकुमार शिंदे, वेदांत गोडगे, शार्दुल भोसले, हुसेफ दामटे, साहिल भराटे, आयुष नलावडे, हर्षदा पालके, आलिजा बागवान आणि सायमा डोंगरे या विद्यार्थ्यांचा समावेश होता.

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. त्यांच्या यशाचे उपस्थित मान्यवर, शिक्षक आणि पालकांनी कौतुक करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांनी व्यक्त केले स्वातंत्र्याचे महत्त्व

यानंतर बालवाडी ते इयत्ता सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी देशाच्या स्वातंत्र्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याचा इतिहास, स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान, राष्ट्रप्रेम आणि देशाप्रती असलेल्या जबाबदाऱ्यांविषयी विचार मांडले.

विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांनी कार्यक्रमाला विशेष रंगत आली. छोट्या विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले.

मान्यवरांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेचे मुख्याध्यापक सत्यजित घाडगे आणि ज्योती दिवाणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच देशप्रेम, शिस्त, प्रामाणिकपणा आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवावी, असे आवाहन करण्यात आले.

या कार्यक्रमास पोलीस कॉन्स्टेबल रजत चव्हाण, शहाजी कोकाटे, संतोष शिंदे, थोरात, हजारे, दत्ता मेहेर, बनसोडे, माजीद शहा बर्फीवाले, विष्णुदास गोडगे यांच्यासह शाळेतील शिक्षक, पालक आणि नागरिक उपस्थित होते.

शिक्षकवृंदांचे परिश्रम

स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष गवळी, संतोष पाटील, नितीन शिंदे, नितीन पाबळे, राजेंद्र जाधव, ज्योती दिवाणे, शिला कांबळे, मंगल हिंगनकर, अश्विनी गवारे, सुजाता देशमुख, सोनाली विभुते, धनश्री काळे आणि दिपाली सुतार यांच्यासह शिक्षकवृंदांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन पाबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन नितीन शिंदे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.


आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.

👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

Post a Comment

0 Comments