ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

परंडा तहसिल कार्यालय, नगर परिषद कार्यालयासह तालुक्यात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा. The 80th Independence Day was celebrated with enthusiasm in the taluka, including the Paranda Tehsil Office and the Municipal Council Office.

परंडा तहसिल कार्यालय, नगर परिषद कार्यालयासह तालुक्यात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा.

The 80th Independence Day was celebrated with enthusiasm in the taluka, including the Paranda Tehsil Office and the Municipal Council Office.
The 80th Independence Day was celebrated with enthusiasm in the taluka, including the Paranda Tehsil Office and the Municipal Council Office.

परंडा दि. १५ (रंगोली न्युज) The 80th Independence Day was celebrated with enthusiasm in the taluka, including the Paranda Tehsil Office and the Municipal Council Office. धाराशिव जिल्ह्यासह परंडा तालुक्यात भारतीय स्वातंत्र्याचा ८० वा वर्धापनदिन आज, १५ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. तहसील कार्यालय, नगर परिषद, पंचायत समिती, तालुका कृषी कार्यालय, पोलीस ठाणे यासह विविध शासकीय व निमशासकीय कार्यालये तसेच शाळा-महाविद्यालयांमध्ये ध्वजारोहण करून स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

परंडा तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तहसीलदार निलेश काकडे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीताने परिसर दुमदुमून गेला. कार्यक्रमास अधीकारी श्रीमती पाटील, नायब तहसीलदार विजय बाडकर, नायब तहसीलदार पूजा गोरे, नायब तहसीलदार मिलिंद पराळे, नायब तहसीलदार प्रसाद टिळे यांच्यासह तहसील कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, शहरातील प्रतिष्ठित मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करून देशाच्या प्रगतीसाठी एकजुटीने कार्य करण्याचा संकल्प केला. स्वातंत्र्यदिनानिमित्त तहसील कार्यालय परिसरात उत्साहाचे आणि देशभक्तीचे वातावरण पाहायला मिळाले.

नगर परिषदेतही उत्साहात ध्वजारोहण

परंडा नगर परिषद कार्यालयाच्या प्रांगणात नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण समारंभ पार पडला. यावेळी राष्ट्रगीत व देशभक्तीपर वातावरणात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.

कार्यक्रमास नगर परिषदेच्या मुख्याधिकारी मनिषा वडेपल्ली, कार्यालयीन अधीक्षक जे. एस. सोंडगे यांच्यासह नगर परिषद कर्मचारी, शहरातील प्रतिष्ठित मान्यवर व नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांना अभिवादन केले.

शाळा-महाविद्यालयांत देशभक्तीचा जागर

परंडा तालुक्यातील पंचायत समिती, तालुका कृषी कार्यालय, पोलीस ठाणे तसेच विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्येही ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये ध्वजारोहण, राष्ट्रगीत, देशभक्तीपर गीते, भाषणे, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील महान स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याची माहिती देत देशभक्तीचा संदेश दिला. अनेक ठिकाणी तिरंगा ध्वज, देशभक्तीपर घोषवाक्ये आणि विविध कार्यक्रमांमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

परंडा तालुक्यातील विविध ठिकाणी नागरिक, अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत ‘देश प्रथम’ या भावनेतून स्वातंत्र्यदिन साजरा केला.


आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.

👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

Post a Comment

0 Comments