परंडा येथील मर्चंट बायपास (डी.पी. रोड) कामासाठी व्यापाऱ्यांचे नगराध्यक्ष यांना निवेदन.
![]() |
| Traders submit a memorandum to the Municipal Council President regarding the Merchant Bypass (DP Road) project at Randa. |
परंडा, दि. ५ (रंगोली न्यूज): Traders submit a memorandum to the Municipal Council President regarding the Merchant Bypass (DP Road) project at Randa. परंडा शहरातील दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी विकास आराखड्यात (डी.पी.) प्रस्तावित असलेला मर्चंट बायपास (डी.पी. रोड/डेव्हलपमेंट प्लॅन रस्ता) तातडीने कार्यान्वित करण्यात यावा, अशी जोरदार मागणी शहरातील व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक व व्यापारी संघटनांनी नगर परिषद प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीमुळे शहराच्या वाहतूक नियोजनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
व्यापारी वर्गाने मुख्याधिकारी व नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, सोनारी रस्ता हा परंडा शहरातील अत्यंत महत्त्वाचा आणि मुख्य वाहतुकीचा मार्ग आहे. हा मार्ग जयभवानी चौक, अगरकर गल्ली, मोमीन गल्ली, मंगळवार पेठ, मंडई पेठ यांसारख्या गजबजलेल्या भागांतून जात असल्याने येथे दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. ग्रामीण भागातून येणारी मालवाहतूक, चारचाकी वाहने, दुचाकी तसेच प्रवासी वाहनांमुळे या मार्गावर सतत वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यामुळे व्यापारी, नागरिक, विद्यार्थी तसेच रुग्णवाहिका, अग्निशमन दल व इतर आपत्कालीन सेवांनाही वेळेवर मार्ग मिळत नसल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत.
व्यापाऱ्यांनी पुढे नमूद केले आहे की, परंडा हे पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवरील महत्त्वाचे शहर असून तालुक्यातील ३० ते ४० गावांतील नागरिक विविध कामांसाठी दररोज शहरात येत असतात. त्यामुळे शहरातील वाहतुकीचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. याशिवाय शहराच्या मध्यभागी असलेला मोठा गाव तलाव आणि ऐतिहासिक भुईकोट किल्ला यांमुळे पर्यायी रस्त्यांची उपलब्धता मर्यादित झाली असून वाहतूक नियोजनाचे आव्हान अधिक गंभीर बनले आहे.
व्यापाऱ्यांच्या मते, छत्रपती संभाजी महाराज चौक ते टिपू सुलतान चौक या दरम्यान प्रस्तावित असलेला डी.पी. रोड तयार झाल्यास शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतूक मोठ्या प्रमाणात वळविता येईल. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, व्यापाऱ्यांचा व्यवसाय सुरळीत होईल, नागरिकांचा वेळ व इंधनाची बचत होईल तसेच अपघातांचे प्रमाणही कमी होईल. भविष्यातील शहर विकासाच्या दृष्टीनेही हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी नगरसेवक वाजिद दखनी, माजी नगराध्यक्ष चांदपाशा शेख, अभय देसाई, सुयोग शहा, जितेंद्र जलाराम, हाफीज करपुडे, तन्वीर डोंगरे, पांडुरंग कासार, नितीन विटकर, मैनुद्दीन तुटके, नुसरत करपुडे, बालाजी बुलबुले, राज शेख, एजाज बागवान, मनसूर बशीर, डॉ. अमोल क्षीरसागर, शाहबाज हन्नुरे, खय्यूम तुटके, अजहर शेख, तय्यब शेख, जुबेर पठाण, रहीम करपुडे यांच्यासह शहरातील अनेक व्यापारी व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
परंडा शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा आणि वाहतुकीच्या वाढत्या ताणाचा विचार करता, विकास आराखड्यातील मर्चंट बायपास (डी.पी. रोड) प्रत्यक्षात उतरविणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यापारी वर्गाने व्यक्त केले आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.
👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!