ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कात्राबाद येथे शालेय व्यवस्थापन समितीची निवड. अध्यक्षपदी शिवाजी अभिमान काळे, तर उपाध्यक्षपदी पूजा शेळके यांची सर्वानुमते निवड. Selection of the School Management Committee at Zilla Parishad Primary School, Katrabad.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कात्राबाद येथे शालेय व्यवस्थापन समितीची निवड.

अध्यक्षपदी शिवाजी अभिमान काळे, तर उपाध्यक्षपदी पूजा शेळके यांची सर्वानुमते निवड

Selection of the School Management Committee at Zilla Parishad Primary School, Katrabad.
Selection of the School Management Committee at Zilla Parishad Primary School, Katrabad.

परंडा दि. ३० (रंगोली न्युज) — Selection of the School Management Committee at Zilla Parishad Primary School, Katrabad. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कात्राबाद येथील शालेय व्यवस्थापन समितीचे शैक्षणिक वर्ष २०२६ ते २०२८ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी पुनर्गठन करण्यात आले. समितीच्या अध्यक्षपदी शिवाजी अभिमान काळे, तर उपाध्यक्षपदी सौ. पूजा ज्योतीराम शेळके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

दि. २७ ऑगस्ट रोजी शाळेत पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेस परंडा केंद्राचे केंद्रप्रमुख नितीन बोराडे निरीक्षक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

शालेय व्यवस्थापन समितीच्या कार्याबाबत मार्गदर्शन

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र माधव कापसे यांनी केले. यावेळी केंद्रप्रमुख नितीन बोराडे यांनी पालकांना शालेय व्यवस्थापन समितीची रचना, अधिकार, जबाबदाऱ्या आणि कार्य याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. शाळेच्या शैक्षणिक विकासात पालक आणि शालेय व्यवस्थापन समितीची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

यानंतर उपस्थित पालकांच्या चर्चेतून शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची निवड करण्यात आली. सर्व सदस्यांच्या एकमताने शिवाजी अभिमान काळे यांची अध्यक्षपदी, तर सौ. पूजा ज्योतीराम शेळके यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

शालेय व्यवस्थापन समिती

अध्यक्ष : श्री. शिवाजी अभिमान काळे

उपाध्यक्ष : सौ. पूजा ज्योतीराम शेळके

सदस्य : सौ. अनुराधा परमेश्वर बोराडे, सौ. प्रीती राहुल गरड, सौ. शितल महावीर बोराडे, सौ. आसिया इम्रान पटेल, सौ. मुबिना बेगम याकुबअली बेग, श्री. दादा गणपती बोराडे, श्री. हर्षद अरुण फासे, श्री. प्रवीण भारत गरड, श्री. दीपक प्रल्हादराव मिरकले, सचिव : मुख्याध्यापक रवींद्र माधव कापसे

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार

शाळेच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सर्व सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. त्यांच्या पुढील कार्यासाठी उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमास परमेश्वर बोराडे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. केंद्रप्रमुख नितीन बोराडे यांनी निरीक्षक म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन केले, तर श्रीमती मनीषा जगताप प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

पालक सभा व समितीच्या निवड प्रक्रियेस पालक, विद्यार्थी, शिक्षणप्रेमी नागरिक, शिक्षक व मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिक्षक दीपक मिरकले यांनी केले.

Post a Comment

0 Comments