सीमेवरील जवानांसाठी परंड्यातील विद्यार्थ्यांनी बनवल्या स्वनिर्मित राख्या.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने जिजामाता प्राथमिक विद्यामंदिरचा स्तुत्य उपक्रम.
![]() |
| A praiseworthy initiative by Jijamata Primary Vidyamandir on the occasion of Raksha Bandhan. |
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी घोटीव कागद, मनी, टिकल्या, स्पंज, सुई-दोरा, डिंक आदी विविध साहित्याचा कल्पकतेने वापर करून रंगीबेरंगी व आकर्षक राख्या तयार केल्या. स्वतः तयार केलेल्या राख्या जवानांना पाठविण्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. देशाच्या सीमेवर अहोरात्र पहारा देणाऱ्या जवानांप्रती प्रेम, आदर आणि कृतज्ञतेची भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, तसेच देशभक्तीचे संस्कार बालवयातच रुजावेत, हा या उपक्रमामागील उद्देश होता.
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या जवानांपर्यंत पोहोचविण्यात आल्याने या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. रक्षाबंधनाचा सण केवळ भाऊ-बहिणीच्या नात्यापुरता मर्यादित न राहता देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांशी भावनिक नाते जोडण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या स्तुत्य उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक सत्यजित घाडगे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांना राख्या तयार करण्यासाठी आवश्यक साहित्य, कलाकुसर आणि योग्य पद्धतीचे मार्गदर्शन शिक्षकांनी केले.
उपक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष गवळी, संतोष पाटील, नितीन शिंदे, नितीन पाबळे, राजेंद्र जाधव, ज्योती दिवाने, शीला कांबळे, मंगल हिंगणकर, अश्विनी गवारे, सोनाली विभुते, सुजाता देशमुख, दिपाली सुतार आणि धनश्री काळे या शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना देतानाच देशसेवेची भावना रुजविणारा हा उपक्रम पालक व परिसरातून कौतुकास पात्र ठरत आहे.

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!