शालेय विद्यार्थांना मोफत गणवेश बुट व पायमोजे, राज्य शासनाची योजना.
राज्य शासनाकडून शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी ८४ कोटीचा निधी मंजुर.
![]() |
| The State Government has sanctioned funds of ₹ 84 crore for the academic year 2026–27. (AI Image) |
रंगोली न्युज - परंडा दि. ५)
The State Government has sanctioned funds of ₹84 crore for the academic year 2026–27. महाराष्ट्र राज्य शासनाने शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत गणवेश, बुट व पायमोजे योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करीता ८४.०० कोटी रू. इतक्या निधी वितरणासा मान्यता देण्यात आली असून प्रति पात्र शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लाभार्थी विद्यार्थ्याला याचा लाभ मिळणार आहे.
समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इ. १ ली ते ८ वी मधील शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अ.जा. व जमाती प्रवर्गातील मुले व दारिद्रयरेषेखलील पालकांची मुले अशा पात्र विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो. यामध्ये केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत "Under the Samagra Shiksha Programme" मोफत गणवेश योजनेकरीता निर्धारित केलेल्या प्रती गणवेश ३०० रू. प्रमाणे राज्य शासनाने दोन गणवेशाकरीता ६०० रू., व एक जोडी बुट व दोन जोडी पायमोजे करीता १७० रू. असे एकून प्रति विद्यार्थी ७७० रू रक्कम निश्चीत केली आहे.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करीता सर्व पात्र विद्यार्थ्यांना गणवेश, बुट व पायमोजे उपलब्ध करून देण्याकरीता महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून १४० कोटी निधीची देण्याची मागणी केली होती. त्याप्रमाणे निधी वितरणास मान्यता देण्याचा प्रस्ताव वित्त विभागास सादर केला होता. वित्त विभागाने सद्यस्थितीमध्ये अर्थसंकल्पिय तरतुदीच्या ६० टक्के मर्यादेत म्हणजेच रू. ८४.०० कोटी निधी वितरणास दि. ४ मे २०२६ च्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे.
योजनेची योजनेची वैशिट्ये :-
👉गणवेशासाठी मिळणारा निधी - प्रत्तेक पात्र विद्यार्थ्याला दोन गणवेशासाठी ६०० रू. निश्चीत आहेत.
👉बुट व पायमोजे साठीचा निधी - प्रत्तेक पात्र विद्यार्थ्याला एक बुट जोडी व दोन पायमोजे जोडी साठी १७० रू.
👉प्रति विद्यार्थी मिळणारा निधी- प्रति विद्यार्थी दोन गणवेशासाठी ६०० व एक बुट जोड व दोन पायमोजे जोड १७० रू. असे एकून ७७० रू. लाभ दिला जातो.
👉गुणवत्ता - संबधीत शालेय व्यवस्थापन समितीने स्थानिक पातळीवर उत्तम प्रतिचे कापड खरेदी करून गणवेश तयार करून घेणे.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!