ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

१२ वी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा ग्लोबल ज्युनिअर कॉलेजमध्ये सत्कार समारंभ सपन्न. A felicitation ceremony was held at Global Junior College for students who achieved outstanding success in the 12th-grade examinations.

१२ वी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा ग्लोबल ज्युनिअर कॉलेजमध्ये सत्कार समारंभ सपन्न.

A felicitation ceremony was held at Global Junior College for students who achieved outstanding success in the 12th-grade examinations.
A felicitation ceremony was held at Global Junior College for students who achieved outstanding success in the 12th-grade examinations.

रंगोली न्युज - परंडा दि. ४)  

ग्लोबल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांनी १२ वी परीक्षेत १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश मिळविल्याबद्दल त्यांचा दि. ४ मे रोजी ग्लोबल इंग्लिश स्कूल येथे गौरव करण्यात आला. 

     विद्यार्थ्यांनी मेहनत व जिद्दच्या जोरावर मिळविलेल्या यशाची पोचपावती म्हणुन या विद्यार्थ्यांना शाबासकीची थाप देण्यासाठी हा गौरव सन्मान सोहळा आयोजीत करण्यात आला होता. या वेळी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सोनाली गटकुळ ८३.६७ टक्के घेत परांडा तालुक्यात प्रथम, राजलक्ष्मी पाटील ही ८०.३३ टक्के घेत द्वितीय तर आरती जाधव ही विद्यालयामध्ये ७२.८३ टक्के घेऊन तृतीय क्रमांक पटकावल्याबद्दल त्यांचा पालकांसोबत विशेष सन्मान करण्यात आला. तसेच सर्व विद्यार्थ्यांचेही त्यांच्या पालकांसोबत सत्कार करून त्यांच्या यशाचे कौतुक करण्यात आले. बारावीच्या बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या उज्ज्वल यशामागे शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन व अथक परिश्रम आहेत. याची दखल घेत संस्थेच्या वतीने सर्व शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला. 

  कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गोरख मोरजकर, सचिव आशाताई मोरजकर व प्रमुख उपस्थिती सुरेश घाडगे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व पालक उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळेच हे यश शक्य झाल्याचे मत व्यक्त करण्यात आले. या यशामुळे ग्लोबल कॉलेजच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.




आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी 

👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

Post a Comment

0 Comments