पुणे जिल्ह्यात चिमुकलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमावर कठोर कारवाईची मागणी.
![]() |
| Demand for strict action against the monster who sexually assaulted and murdered a young girl in Pune district. |
रंगोली न्युज - परंडा दि. ५)
Demand for strict action against the monster who sexually assaulted and murdered a young girl in Pune district. नसरापूर ता. भोर जि. पुणे येथे ४ वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचार व निर्घृण हत्येच्या घटनेचे पडसाद धाराशिव जिल्हा परंडा तालुक्यात उमटले असून या घटनेचा निषेध करण्यासाठी परंडा शहरातील सकल समाज बांधवांनी विविध सामाजिक राजकीय क्षेत्रातील नागरिकांनी एकत्र येत तहसीलदारांना दि. ४ रोजी निवेदन देऊन अशा नराधमावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.
पुणे येथील या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, परंडा तालुक्यातील ग्रामस्थांनी या नराधमाचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. यावेळी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, याप्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी, तसेच पीडित कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत व संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी रिपब्लिकन पार्टी (आठवले गट) प्रदेश चिटणीस संजयकुमार बनसोडे, राष्ट्रीय कांग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष ॲड. श्रीकांत भालेराव, यांनी तिव्र शब्दात भावना व्यक्त केल्या यावेळी विकास कुलकर्णी, सारंग खंडागळे, ॲड अशोक जाधव, अमित जोशी, रवी वैद्य अप्पा बनसोडे, विशाल काशीद राहूल देवळे कृष्णा चैतन्य, शहाजी चौधरी शैलेश जोशी जयेश विद्वत स्वानंद कुलकर्णी, सतिश कुलकर्णी अक्षय देशमुख नागेश वैद्य, अमोल कुलकर्णी आदिसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!