ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

परंडा येथील न्यायालयामध्ये दि. ९ मे रोजी राष्ट्रीय लोक अदालत चे आयोजन. नागरीकांना न्यायालयीन प्रकरणे तडजोडीने व सामंजस्याने मिटवून घेण्याची संधी. A National Lok Adalat will be organized at the Paranda Court on May 9th.

परंडा येथील न्यायालयामध्ये  दि. ९ मे रोजी राष्ट्रीय लोक अदालत चे आयोजन.

नागरीकांना न्यायालयीन प्रकरणे तडजोडीने व सामंजस्याने मिटवून घेण्याची संधी.

A National Lok Adalat will be organized at the Paranda Court on May 9th.
A National Lok Adalat will be organized at the Paranda Court on May 9th.

रंगोली न्युज - परांडा दि. ३) 

A National Lok Adalat was organized at the court in Paranda. मा. उच्च न्यायालय यांचे आदेशानुसार धाराशिव जिल्ह्यातील परंडा न्यायालय येथे शनिवार दि. ९ मे २०२६ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.

      लोक अदालत ही विधी सेवा प्राधिकरण अधिनियम १९८७ अंतर्गत एक पार्यायी विवाद निराकरण यंत्रणा आहे. जी विनामूल्य व सलोख्याने निराकरण करते. यामध्ये तडजोडीला महत्वा दिले जाते. त्यामध्ये फौजदारी तडजोडीचे गुन्हे, दिवाणी, कौटुंबीक वाद चा समावेश असतो. यामुळे नागरीकांचा पैसा व वेळ नक्कीच वाचते.

    धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथील दि. ९ मे २०२६ रोजीच्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सर्व प्रकारची दिवाणी दावे, तडजोडीस पात्र असलेली  फौजदारी प्रकरणे, पोटगीची प्रकरणे, तसेच दावा दाखल पूर्व प्रकरणे तडजोडी आधारे मिटविण्यात येणार आहेत.     

    तरी परंडा तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी दि. ९ मे रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालती मध्ये आपापली प्रकरणे तडजोडीने व सामंजस्याने मिटवून घ्यावीत व वेळेची तसेच पैशाची बचत करावी असे आवाहन परांडा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश डॉ. एफ. ए. एम. ख्वाजा यांनी केले आहे.



आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी 

👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

Post a Comment

0 Comments