ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

भोत्रा येथील सुनिल पवार यांना समाज गौरव पुरस्काराने सन्मानित. Sunil Pawar of Bhotra was honored with the Samaj Gaurav Award.

भोत्रा येथील सुनिल भाऊ पवार यांना समाज गौरव पुरस्काराने सन्मानित.

Sunil Bhau Pawar of Bhotra was honored with the Samaj Gaurav Award.
Sunil Bhau Pawar of Bhotra was honored with the Samaj Gaurav Award.

रंगोली न्यूज - परंडा दि. ३) 

Sunil Bhau Pawar of Bhotra was honored with the Samaj Gaurav Award. धाराशिव जिल्हा परंडा तालुक्यातील भोञा गावाचे सुपुत्र, सामाजिक कार्यकर्ते सुनिल दिगंबर पवार यांना १ मे महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त पुणे येथील पिंपरी चिंचवड येथे महानगरपालिका व महाराष्ट्र वडार मजुर शिल्प प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने २०२६ चा समाज गौरव पुरस्कार "Samaj Gaurav Award" देऊन गौरवण्यात आले. 

    यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका चे महापौर रवीभाऊ लांडगे, उपमहापौर सौ. शर्मिला बाबर, मऺञालय गृह विभागाचे अधिकारी यशवंतराव लष्करे, उच्च तंत्र शिक्षण विभागाचे अधिकारी सुधीर पवार, एम आय डीसी चिफ इंजिनियर कालीदास भांडेकर, जेष्ठ साहित्यिक टि. एस चव्हाण, भारतीय सशस्त्र सेना दल पुणे चे अधिकारी कर्नल ॠषिकेश धोञे, ससुन हॉस्पिटल चे प्रशासकीय अधिकारी सदाशिवराव जाधव, सभापती, कैलास कुटे, भाऊसाहेब भोईर, माजी उपमहापौर मुकारी आलगुडे व उद्योजक संजय भोसले व नितीन दादा धोञे, मी वडार महाराष्ट्राचा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रवी दादा शिंदे, मजुर शिल्प प्रतिष्ठान चे  शाम विटकर, पिटु जाधव व विष्णू आण्णा चौगुले सोलापूरकर, सागर ओरसे  व लखन पाटकर वडार एकता परीषद चे भरत विटकर व जेष्ठ पञकार रमेश जेठे, नगरसेविका अर्पणा कुराडे, नगरसेविका सौ वैशाली काळभोर, नगरसेवक प्रमोद कुटे यांच्यासह, आजी माजी नगरसेवक, विविध क्षेत्रातील अधिकारी, उद्योजक, मी वडार महाराष्ट्राचा प्रदेश संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.    

    कार्यक्रमात शिल्पकार गौरव पुरस्कार, समाज गौरव पुरस्कार, गुणगौरव पुरस्कार, विविध क्षेत्रातील मान्यवरांना देण्यात आले. सुनिल भाऊ पवार भोञेकर यांना समाज गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.



आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी 

👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!


Post a Comment

0 Comments